राष्ट्रीय दुखवट्यामुळे माळेगावातील शासकीय कार्यक्रम 2 जानेवारी नंतर होणार 

राष्ट्रीय दुखवट्यामुळे माळेगावातील शासकीय कार्यक्रम 2 जानेवारी नंतर होणार

नांदेड – भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात 26 डिसेंबर ते एक जानेवारी सात दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. त्यामुळे 29 डिसेंबर पासून सुरु होणाऱ्या माळेगाव येथील यात्रेतील शासकीय कार्यक्रम २ जानेवारीनंतर घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी या संदर्भात आज जारी केलेल्या पत्रकामध्ये हा बदल जाहीर केला आहे.
दक्षिणेतील सुप्रसिद्ध माळेगाव यात्रेतील शासकीय कार्यक्रमांचे आयोजन नांदेड जिल्हा परिषद, लोहा पंचायत समिती व माळेगाव ग्रामपंचायत मार्फत केला जाते.

पालखी २९ डिसेंबरलाच
तथापि, पारंपारिक पद्धतीने स्थानिक देवस्थान संस्थानमार्फत तिथीनुसार निघणारी 29 डिसेंबरची देव स्वारी व पालखीचे पूजन नियोजित वेळी म्हणजे 29 डिसेंबरला दुपारी दोन वाजता होणार आहे. त्यात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही.

अन्य कार्यक्रम २ जानेवारीपासून

मात्र 29 तारखे नंतरच्या नियोजित कार्यक्रमांमध्ये बदल करण्यात आला असून आता सर्व कार्यक्रम 2 जानेवारी नंतर होणार आहे. 29 तारखेपासून यात्रा नियमित सुरू असेल. मात्र जिल्हा प्रशासनामार्फत आयोजित काही कार्यक्रमांमध्ये उलट फेर करण्यात आला आहे.

२ जानेवारीनंतरचे कार्यक्रम

जिल्हा परिषद प्रशासनाने नव्याने जाहीर केलेल्या कार्यक्रम पत्रिकेनुसार कार्यक्रम पुढील प्रमाणे आहेत…

2 जानेवारीला सकाळी दहा वाजता अश्व, श्वान, कुक्कुट प्रदर्शन व विविध स्पर्धांचे उद्घाटन होईल.

महिला व बालकांसाठी विविध स्पर्धा सकाळी 11 वाजता दुपारी दोन वाजता कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन व कृषीनिष्ठ शेतकऱ्यांचा सत्कार होणार आहे.

तर दुपारी ३ वाजताच लावणी महोत्सवाचा कार्यक्रम होणार आहे. हे सर्व कार्यक्रम 2 जानेवारी रोजी एकाच दिवशी वेगवेगळ्या वेळी घेण्यात येणार आहे.

3 जानेवारीला सकाळी 11 वाजता आरोग्य शिबिर होणार आहे. तर याच दिवशी जिल्हा परिषदेमार्फत पारंपारिक लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दुपारी दोन वाजता सुरू होईल.

४ जानेवारी रोजी सकाळी दुपारी १२वाजता शंकर पटाचे ( बैल जोडी,बैलगाडा शर्यत ) आयोजित करण्यात आली आहे.

5 जानेवारी रोजी दुपारी अकरा वाजता पशुप्रदर्शन व दुग्ध स्पर्धा बक्षीस वितरण समारोह होणार आहे. तर 5 जानेवारीला दुपारी बारा वाजता कुस्त्यांची दंगल होणार आहे.

भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे 26 डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथील एम्स हॉस्पिटलमध्ये निधन झाले. दिवंगत माजी पंतप्रधानांच्या स्मरणार्थ संपूर्ण देशात 26 डिसेंबर ते एक जानेवारी असा एकूण सात दिवसांचा राज्य दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. दुखवट्याच्या कालावधीत संपूर्ण भारतात सदर दिवशी कोणत्याही शासकीय मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत,असे आदेश शासनाने दिले आहेत. नांदेड जिल्हाधिकाऱ्यांनीही या संदर्भात आदेश निर्गमित केले आहे.

त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरील कार्यक्रमाचे पुनर्नियोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमांच्या बदललेल्या तारखांना नागरिकांनी, भाविकांनी व श्रद्धाळूंनी लक्षात घ्यावे. राष्ट्रीय दुखवट्यानंतर होणाऱ्या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, सहभागीत्व ठेवावे, असे आवाहन, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी केले आहे.

  • Avatar

    Ankush Sonsale

    Related Posts

    शेतीच्या वादातून 75 वर्षीय वृद्धेची गळा दाबून हत्या; आरोपी पुणे येथून गजाआड

    शेतीच्या वादातून 75 वर्षीय वृद्धेची गळा दाबून हत्या; आरोपी पुणे येथून गजाआड ​लोहा पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी;  गुन्हा दाखल होताच 3 दिवसांत आरोपीला अटक लोहा – ​तालुक्यातील ढगे पिंपळगाव येथे शेतीच्या…

    Continue reading
    आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या, यशोदाबाई बाबुराव निलंगेकर यांचे निधन

    आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या, यशोदाबाई बाबुराव निलंगेकर यांचे निधन नांदेड: आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते आणि भारिपचे प्रथम नगरसेवक कालवश बाबुरावजी निलंगेकर यांच्या पत्नी उपासिका यशोदाबाई निलंगेकर यांचे आज, दिनांक १२…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    शेतीच्या वादातून 75 वर्षीय वृद्धेची गळा दाबून हत्या; आरोपी पुणे येथून गजाआड

    शेतीच्या वादातून 75 वर्षीय वृद्धेची गळा दाबून हत्या; आरोपी पुणे येथून गजाआड

    आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या, यशोदाबाई बाबुराव निलंगेकर यांचे निधन

    आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या, यशोदाबाई बाबुराव निलंगेकर यांचे निधन

    लोहाच्या वडेपुरी शिवारात बिबट्याचा संचार; व्हिडीओ व्हायरल

    लोहाच्या वडेपुरी शिवारात बिबट्याचा संचार; व्हिडीओ व्हायरल

    नांदेड विभागाची ऐतिहासिक कामगिरी! एकाच दिवसात २ लाख ७६ हजार प्रवाशांची विक्रमी रेल्वे वाहतूक यशस्वीपणे हाताळली

    नांदेड विभागाची ऐतिहासिक कामगिरी! एकाच दिवसात २ लाख ७६ हजार प्रवाशांची विक्रमी रेल्वे वाहतूक यशस्वीपणे हाताळली

    शेतकऱ्यांच्या छाताडावर प्रशासनाचा ‘उत्सव’, खा. अशोक चव्हाणांचा मात्र वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

    शेतकऱ्यांच्या छाताडावर प्रशासनाचा ‘उत्सव’, खा. अशोक चव्हाणांचा मात्र वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

    उपमुख्यमंत्री अजित पवार नांदेडात दाखल; विमानतळावर जोरदार स्वागत

    उपमुख्यमंत्री अजित पवार नांदेडात दाखल; विमानतळावर जोरदार स्वागत