नांदेड महापालिकेच्या कार्यकारी अभियंता पदी विश्वनाथ स्वामी तर क्षेत्रीय अधिकारी पदी राजेश जाधव, गौतम कवडे यांची नियुक्ती

नांदेड महापालिकेच्या कार्यकारी अभियंता पदी विश्वनाथ स्वामी तर क्षेत्रीय अधिकारी पदी राजेश जाधव, गौतम कवडे यांची नियुक्ती

नांदेड – नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रभारी कार्यकारी अभियंता पदी महापालिकेचे उपअभियंता विश्वनाथ मनोहर स्वामी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाजी बाबरे यांच्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीनंतर हे पद रिक्त झाले होते. या पदावर आता विश्वनाथ स्वामी यांची प्रभारी कार्यकारी अभियंता पदी नियुक्ती करण्यात येत असल्याचे आदेश मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी मंगळवारी काढले. त्यासोबतच अशोकनगरचे क्षेत्रीय अधिकारी डॉ. मिर्झा फरहतुलाह बेग यांची सिडको क्षेत्रिय कार्यालय येथे नुकतीच बदली करण्यात आली. त्यांच्या रिक्त जागेवर महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय क्रमांक २ अशोकनगरचे वरिष्ठ लिपिक राजेश जाधव यांची प्रभारी क्षेत्रीय अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली. वजिराबाद झोनचे क्षेत्रीय अधिकारी संजय जाधव यांची महानगरपालिकेच्या उपायुक्त पदी पदोन्नतीने नुकतीच नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या रिक्त जागेवर क्षेत्रीय कार्यालय क्रमांक ४ वजीराबाद-इतवाराचे वरिष्ठ लिपिक गौतम कवडे यांची याच क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभारी क्षेत्रीय अधिकारी पदी नियुक्ती करण्यात येत असल्याचेही आदेश महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी काढले आहेत. नवनियुक्त सर्व प्रभारी अधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

  • Avatar

    Ankush Sonsale

    Related Posts

    गोळीबाराच्या घटनेत बनाव उघड; तरुणाने स्वतःवरच गोळी झाडून घेतल्याची बाब पोलीस तपासात निष्पन्न 

    गोळीबाराच्या घटनेत बनाव उघड; तरुणाने स्वतःवरच गोळी झाडून घेतल्याची बाब पोलीस तपासात निष्पन्न  नांदेड : शहराजवळ वाजेगाव परिसरात गोळीबार झाल्याची माहिती बुधवारी ११ फेब्रुवारी रोजी वाऱ्यासारखी पसरली होती. एका तरुणावर…

    Continue reading
    नांदेडमध्ये पुन्हा गोळीबार; कुख्यात ‘अबू शूटर’कडून तरुणावर जीवघेणा हल्ला; टोळीयुद्धातून गोळीबार झाल्याचा संशय

    नांदेडमध्ये पुन्हा गोळीबार; कुख्यात ‘अबू शूटर’कडून तरुणावर जीवघेणा हल्ला; टोळीयुद्धातून गोळीबार झाल्याचा संशय नांदेड : शहरात मागील काही दिवसांपासून शांत असलेले गुन्हेगारी जग पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने हादरले आहे. आज, ११…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    शब्दांचा ऋषी हरपला! ज्येष्ठ साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. जनार्दन वाघमारे यांचे निधन

    शब्दांचा ऋषी हरपला! ज्येष्ठ साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. जनार्दन वाघमारे यांचे निधन

    पंधरा हजार बनावट जन्म नोंदी करणाऱ्या “त्या” आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; झारखंडमधील ५ आरोपी जेरबंद

    पंधरा हजार बनावट जन्म नोंदी करणाऱ्या “त्या” आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; झारखंडमधील ५ आरोपी जेरबंद

    इस्त्रायलमध्ये भारतीय उमेदवारांना नोकरीची संधी; इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन

    इस्त्रायलमध्ये भारतीय उमेदवारांना नोकरीची संधी; इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन

    गोळीबाराच्या घटनेत बनाव उघड; तरुणाने स्वतःवरच गोळी झाडून घेतल्याची बाब पोलीस तपासात निष्पन्न 

    गोळीबाराच्या घटनेत बनाव उघड; तरुणाने स्वतःवरच गोळी झाडून घेतल्याची बाब पोलीस तपासात निष्पन्न 

    मुखेड तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन