अशोक चव्हाण बाहेर पडताच, मुस्लिम समाजाला विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याची काँग्रेसने दिली संधी; नांदेड उत्तर मधून माजी महापौर अब्दुल सत्तार यांना उमेदवारी घोषीत

अशोक चव्हाण बाहेर पडले अन मुस्लिम समाजाला विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याची काँग्रेसने दिली संधी

नांदेड उत्तर मधून माजी महापौर अब्दुल सत्तार यांना उमेदवारी घोषीत 

नांदेड – मुस्लिम समाजाचा काँग्रेसने फक्त वोट बँक म्हणून वापर केला.  काँग्रेसचे तत्कालीन नेते, माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे विद्यमान राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनी वर्षानुवर्षे या समाजाला विधानसभेत किंवा लोकसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधीच दिली नाही, अशा प्रकारची नाराजी मुस्लिम समाजात पसरली असतानाच,  यावेळी मात्र काँग्रेस पक्षाने मुस्लिम समाजाला नांदेड मधून राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. काँग्रेसची चौथी यादी रविवारी २७ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली.  यामध्ये ८६-उत्तर नांदेड विधानसभा मतदार संघातून नांदेडचे माजी महापौर अब्दुल सत्तार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.  त्यामुळे बहुसंख्य मुस्लिम समाजामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

काँग्रेसकडून रविवारी जारी करण्यात आलेल्या चौथ्या यादीत राज्यातील एकूण १४ उमेदवारांचा समावेश आहे.  त्यामध्ये नांदेड उत्तर मधून अब्दुल सत्तार अब्दुल गफूर यांच्याही नावाचा समावेश करण्यात आला आहे.

यापूर्वी तिसऱ्या यादीत काँग्रेसचे १६ उमेदवार होते, त्यापैकी नांदेड जिल्ह्यातील ०३ नावे घेण्यात आली होती. यात नांदेड दक्षिणमधून मोहन हंबर्डे,  मुखेडमधून हणमंत पाटील बेटमोगरेकर तर देगलूरमधून निवृत्तीराव कांबळे आदींचा समावेश आहे.  दुसऱ्या २३ उमेदवारांच्या यादीत नांदेड जिल्ह्यातील एकाही उमेदवाराचे नाव समाविष्ट करण्यात आले नव्हते, तर काँग्रेसच्या पहिल्या यादीत ४८ उमेदवार जाहीर करण्यात आले. यात नांदेड जिल्ह्यातील ०३ उमेदवार घोषीत करण्यात आले.  हदगावमधून माधवराव पाटील जवळगावकर भोकरमधून तिरुपती पाटील कोंडेकर व नायगावमधून मिनल पाटील खतगावकर यांचा समावेश आहे.

दरम्यान, नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या जागेसाठी अनेक इच्छुक देव पाण्यात ठेवून बसले होते.  आपापल्या परीने वरिष्ठ स्तरावर फिल्डिंग लावण्याचाही प्रयत्न झाला. त्यामुळे वाटाघाटीत महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये दीर्घकाळ चर्चा झाली.  उत्तरची जागा ठाकरे गटाला, राष्ट्रवादीला की काँग्रेसला सुटणार, याची उत्सुकता लागली होती. शेवटी माजी महापौर अब्दुल सत्तार यांनी थेट दिल्ली आणि मुंबईची वारी करून बाजी मारली.

  • Avatar

    Ankush Sonsale

    Related Posts

    बसस्थानकांवरील महिला चोरट्यांची टोळी जेरबंद; ५ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त

    बसस्थानकांवरील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या अंगावरील आणि पर्समधील दागिने लंपास करणाऱ्या महिलांच्या टोळीचा पर्दाफाश नांदेड: जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बसस्थानकांवरील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या अंगावरील आणि पर्समधील दागिने लंपास करणाऱ्या…

    Continue reading
    नांदेड-गोवा विमानसेवेचा मार्ग मोकळा; ‘फ्लाय-91’ कडून दोन विमानांसाठी भाडेकरार पूर्ण

    नांदेड-गोवा विमानसेवेचा मार्ग मोकळा; ‘फ्लाय-91’ कडून दोन विमानांसाठी भाडेकरार पूर्ण ​नांदेड – येथील श्री गुरुगोबिंद सिंघजी विमानतळावरून प्रलंबित असलेली विमानसेवा पुन्हा सुरू होण्याच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल उचलले गेले आहे.…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बसस्थानकांवरील महिला चोरट्यांची टोळी जेरबंद; ५ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त

    बसस्थानकांवरील महिला चोरट्यांची टोळी जेरबंद; ५ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त

    नांदेड-गोवा विमानसेवेचा मार्ग मोकळा; ‘फ्लाय-91’ कडून दोन विमानांसाठी भाडेकरार पूर्ण

    नांदेड-गोवा विमानसेवेचा मार्ग मोकळा; ‘फ्लाय-91’ कडून दोन विमानांसाठी भाडेकरार पूर्ण

    नांदेड येथील गोळीबार प्रकरणी पोलिसांनी १० आरोपींना ठोकल्या बेड्या; अवघ्या २४ तासात केले जेरबंद

    नांदेड येथील गोळीबार प्रकरणी पोलिसांनी १० आरोपींना ठोकल्या बेड्या; अवघ्या २४ तासात केले जेरबंद

    ३९ व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे उद्या उदघाटन

    ३९ व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे उद्या उदघाटन

    ३१ डिसेंबर व नववर्ष स्वागतासाठी नांदेड पोलीस सज्ज; आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

    ३१ डिसेंबर व नववर्ष स्वागतासाठी नांदेड पोलीस सज्ज; आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

    नायगाव पोलिसांची मोठी कारवाई: तलवीड शिवारातील जुगार अड्ड्यावर छापा, १२ जणांना अटक, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

    नायगाव पोलिसांची मोठी कारवाई: तलवीड शिवारातील जुगार अड्ड्यावर छापा, १२ जणांना अटक, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त