सुप्रसिद्ध नाट्यलेखक डॉ. विलासराज भद्रे यांचे निधन

चळवळ जगणारा विचारवंत हरपला

Nanded Vruttavedh

नांदेड – सुप्रसिद्ध नाट्यलेखक, रंगकर्मी आणि आंबेडकरी चळवळीतील अभ्यासक-विचारवंत डॉ. विलासराज भद्रे यांचे आज (५ ऑक्टोबर) पहाटे ४.४५ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या ५६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने नाट्यसृष्टी, सांस्कृतिक आणि आंबेडकरी वैचारिक चळवळीवर शोककळा पसरली आहे.

डॉ. भद्रे यांनी वैद्यकीय क्षेत्रात सेवा बजावतानाच कला आणि साहित्याची आवड जोपासली. रंगभूमीवर अभिनय आणि दिग्दर्शनाच्या माध्यमातून त्यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. नाटककार म्हणून त्यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या कलाकृतींना रसिकप्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

आंबेडकरी विचारसरणीचा गाढा अभ्यास असलेल्या डॉ. भद्रे यांनी आपल्या साहित्यातून सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक भान नेहमीच जपले. शोषित आणि वंचितांच्या वेदनांना वाचा फोडणारे लेखन हे त्यांच्या साहित्याचे प्रमुख वैशिष्ट्य राहिले. त्यांनी आपल्या कार्यातून सामाजिक बांधिलकीचे सातत्यपूर्ण दर्शन घडवले.

त्यांच्या पार्थिवावर आज, ५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता उमरी (रेल्वे स्टेशन) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. उमरी व नांदेड परिसरातील अनेक मान्यवर, कलावंत आणि नागरिक अंत्यविधीसाठी उपस्थित राहणार आहेत.

त्यांच्या पश्चात आई, एक भाऊ (माजी नगरसेवक अरुण भद्रे), पत्नी डॉ. वंदना भद्रे, एक मुलगी आणि दोन बहिणी असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कला, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील एका अभ्यासू व्यक्तिमत्त्वाला समाज अंतरला आहे.

  • Avatar

    Ankush Sonsale

    Related Posts

    सेवानिवृत्त नायब तहसीलदार मदनराव जोंधळे यांचे निधन

    सेवानिवृत्त नायब तहसीलदार मदनराव जोंधळे यांचे निधन Nanded Vruttavedh नांदेड – इतवारा, मोहम्मद अली रोड, नांदेड येथील ज्येष्ठ उपासक व सेवानिवृत्त नायब तहसीलदार मदनराव श्रीधरराव जोंधळे (वय ७३ वर्ष) यांचे…

    Continue reading
    महापालिकेच्या कोट्यवधींच्या खर्चानंतरही सुरक्षेचा बोजवारा: डॉ. शंकरराव चव्हाण सभागृहात मुदत संपलेली अग्निशमन यंत्रे!

    महापालिकेच्या कोट्यवधींच्या खर्चानंतरही सुरक्षेचा बोजवारा: डॉ. शंकरराव चव्हाण सभागृहात मुदत संपलेली अग्निशमन यंत्रे! Nanded Vruttavedh नांदेड – महापालिकेच्या वतीने कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून सुसज्ज करण्यात आलेल्या डॉ. शंकरराव चव्हाण…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    सेवानिवृत्त नायब तहसीलदार मदनराव जोंधळे यांचे निधन

    सेवानिवृत्त नायब तहसीलदार मदनराव जोंधळे यांचे निधन

    महापालिकेच्या कोट्यवधींच्या खर्चानंतरही सुरक्षेचा बोजवारा: डॉ. शंकरराव चव्हाण सभागृहात मुदत संपलेली अग्निशमन यंत्रे!

    महापालिकेच्या कोट्यवधींच्या खर्चानंतरही सुरक्षेचा बोजवारा: डॉ. शंकरराव चव्हाण सभागृहात मुदत संपलेली अग्निशमन यंत्रे!

    नांदेड शहरात ब्राऊन शुगरची विक्री, श्रीनगर, विवेकनगरातून दोघे अटकेत; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

    नांदेड शहरात ब्राऊन शुगरची विक्री,  श्रीनगर, विवेकनगरातून दोघे अटकेत; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

    मान्सून आला तसा परत गेला, तरीही नांदेड जिल्ह्यात पाऊस? १७ व १८ रोजी येलो अलर्ट!

    मान्सून आला तसा परत गेला, तरीही नांदेड जिल्ह्यात पाऊस?  १७ व १८ रोजी येलो अलर्ट!

    नांदेड जिल्ह्यात पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचा धडाका; नांदेड ग्रामीण, विमानतळ, अर्धापूर, मुदखेडसह ६ अधिकाऱ्यांची खांदेपालट