नांदेड शहरात मध्यरात्री कोंबिंग ऑपरेशन राबवून गुन्हेगारांची धरपकड

नांदेड शहरात मध्यरात्री कोंबिंग ऑपरेशन राबवून गुन्हेगारांची धरपकड

​नांदेड : शहरात चोरी आणि शरीराविरुद्धच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत गेल्या १० दिवसांत १२५ पेक्षा जास्त सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली असून, ऑन रेकॉर्ड असलेल्या अनेक आरोपींची कसून तपासणी आणि राउंडिंग अप सुरू करण्यात आले आहे. मंगळवारी रात्री 11 वाजेपासून बुधवारी पहाटे 3 वाजेपर्यंत शहरात विशेष कोंबिंग ऑपरेशन राबवून गुन्हेगारांची मोठी झाडाझडती घेण्यात आली.
​या मोहिमेमध्ये अपर पोलीस अधीक्षक (भोकर), उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा आणि शहरातील विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व अंमलदार अशा एकूण २७ अधिकाऱ्यांसह ९८ कर्मचाऱ्यांचा ताफा सहभागी झाला होता. यामध्ये प्रामुख्याने सोनखेड आणि उस्माननगर पोलीस ठाण्यांच्या पथकांनीही सक्रिय सहभाग नोंदवत शहरातील संवेदनशील भागांत शोधमोहीम राबवली.
​कोंबिंग ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी तडीपार केलेले ४१ गुन्हेगार, MPDA अंतर्गत सुटलेले २६ गुन्हेगार आणि शरीराविरुद्ध गुन्हे करणारे ५५ सराईत गुन्हेगार तपासून पाहिले. यामध्ये अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कारवाई करताना आर्म्स ॲक्ट अंतर्गत ४ गुन्हे दाखल करण्यात आले, तर महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १२२ अन्वये २ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. तसेच, भाग्यनगर पोलीस ठाण्यातील एका पाहिजे असलेल्या आरोपीलाही या मोहिमेत अटक करण्यात आली आहे.
​गेल्या काही दिवसांतील कारवाईचा आढावा घेतल्यास, ६ एप्रिल ते २१ एप्रिल या कालावधीत मोठ्या प्रमाणात गुन्हेगारांची तपासणी झाली आहे. हद्दपार केलेल्या व्यक्तींची तपासणी करताना ८ आरोपी शहरातच मिळून आल्याने त्यांच्यावर कलम १४२ प्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत. एकूण मोहिमेत १०२ आरोपींविरुद्ध कारवाई करत ८९ गुन्हे दाखल करण्यात आले असून, यात अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत (NDPS Act) १५ जणांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
​नांदेड पोलीस दलाने राबविलेल्या या धडक मोहिमेमुळे गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडाली असून, शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी यापुढेही अशा कारवाया सुरूच राहतील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

  • Avatar

    Ankush Sonsale

    Related Posts

    सेवानिवृत्त नायब तहसीलदार मदनराव जोंधळे यांचे निधन

    सेवानिवृत्त नायब तहसीलदार मदनराव जोंधळे यांचे निधन Nanded Vruttavedh नांदेड – इतवारा, मोहम्मद अली रोड, नांदेड येथील ज्येष्ठ उपासक व सेवानिवृत्त नायब तहसीलदार मदनराव श्रीधरराव जोंधळे (वय ७३ वर्ष) यांचे…

    Continue reading
    महापालिकेच्या कोट्यवधींच्या खर्चानंतरही सुरक्षेचा बोजवारा: डॉ. शंकरराव चव्हाण सभागृहात मुदत संपलेली अग्निशमन यंत्रे!

    महापालिकेच्या कोट्यवधींच्या खर्चानंतरही सुरक्षेचा बोजवारा: डॉ. शंकरराव चव्हाण सभागृहात मुदत संपलेली अग्निशमन यंत्रे! Nanded Vruttavedh नांदेड – महापालिकेच्या वतीने कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून सुसज्ज करण्यात आलेल्या डॉ. शंकरराव चव्हाण…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    सेवानिवृत्त नायब तहसीलदार मदनराव जोंधळे यांचे निधन

    सेवानिवृत्त नायब तहसीलदार मदनराव जोंधळे यांचे निधन

    महापालिकेच्या कोट्यवधींच्या खर्चानंतरही सुरक्षेचा बोजवारा: डॉ. शंकरराव चव्हाण सभागृहात मुदत संपलेली अग्निशमन यंत्रे!

    महापालिकेच्या कोट्यवधींच्या खर्चानंतरही सुरक्षेचा बोजवारा: डॉ. शंकरराव चव्हाण सभागृहात मुदत संपलेली अग्निशमन यंत्रे!

    नांदेड शहरात ब्राऊन शुगरची विक्री, श्रीनगर, विवेकनगरातून दोघे अटकेत; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

    नांदेड शहरात ब्राऊन शुगरची विक्री,  श्रीनगर, विवेकनगरातून दोघे अटकेत; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

    मान्सून आला तसा परत गेला, तरीही नांदेड जिल्ह्यात पाऊस? १७ व १८ रोजी येलो अलर्ट!

    मान्सून आला तसा परत गेला, तरीही नांदेड जिल्ह्यात पाऊस?  १७ व १८ रोजी येलो अलर्ट!

    नांदेड जिल्ह्यात पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचा धडाका; नांदेड ग्रामीण, विमानतळ, अर्धापूर, मुदखेडसह ६ अधिकाऱ्यांची खांदेपालट

    नांदेड जिल्ह्यात पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचा धडाका; नांदेड ग्रामीण, विमानतळ, अर्धापूर, मुदखेडसह ६ अधिकाऱ्यांची खांदेपालट

    सुप्रसिद्ध नाट्यलेखक डॉ. विलासराज भद्रे यांचे निधन

    सुप्रसिद्ध नाट्यलेखक डॉ. विलासराज भद्रे यांचे निधन