नांदेडच्या पाच बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी

नांदेडच्या पाच बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी

भाजपचे मिलिंद देशमुख, वैशाली देशमुख, दिलीप कंदकुर्ते, सुनील मोरे व संजय घोगरे यांचा समावेश

नांदेड – विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाने तिकीट दिले नाही, म्हणून महायुतीचा उमेदवार असतानाही अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करीत बंडखोरी करणाऱ्या महाराष्ट्रातील भाजपच्या 40 पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाने राज्यातील वेगवेगळ्या 37 विधानसभा मतदारसंघातून 40 जणांची हकालपट्टी केली आहे. यात नांदेड उत्तर मधून भाजपशी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करणारे मिलिंद देशमुख, माजी नगरसेविका वैशाली देशमुख, तर नांदेड दक्षिण मतदार संघातून भाजपशी अर्थात महायुतीशी बंडखोरी करून भाजपचे महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, सुनील मोरे व संजय घोगरे यांचाही समावेश आहे. पक्षाचे पदाधिकारी असून पक्षशिस्तीचा भंग केल्याचा ठपका या बंडखोरांवर ठेवण्यात आला आहे. मंगळवार दि. 5 नोव्हेंबर रोजी, भाजपचे कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांच्या स्वाक्षरीनिशी 40 जणांची यादी आज 6 नोव्हेंबर रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
पक्षासोबत बंडखोरी करणाऱ्या 40 जणांना अखेर बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. पक्षाने सांगूनही उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने पक्षाकडून ही कारवाई केल्याचे बोलले जात आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बंडखोरी करणाऱ्यांवर पक्षातून 6 वर्षासाठी निलंबित करणार असल्याचे काही दिवसांपूर्वीच सांगितले होते.

  • Avatar

    Ankush Sonsale

    Related Posts

    खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह ५० ते ६० जणांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी; शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल

    Nanded Vruttavedh । हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावून समाजात तेढ निर्माण केल्याचा आरोप ​नांदेड – खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह विठ्ठल पावडे, अब्दुल गफार, माजी आमदार हनुमंत पाटील बेटमोगरेकर, मुन्ना अब्बास…

    Continue reading
    आधी स्वतःचे घर सांभाळा, नंतर इतरांची काळजी करा; आ. राजूरकर यांचा आ. रोहित पवार यांना टोला

    Nanded Vruttavedh नांदेड : खा. अशोक चव्हाण हे राज्याचे नेते होते, आहेत व राहतील, यात तीळमात्र शंका नाही. त्यांचा सन्मान व त्यांना न्याय देण्याचा विषय भाजप श्रेष्ठी पाहतील. परंतु, तुम्ही…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह ५० ते ६० जणांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी; शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल

    खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह ५० ते ६० जणांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी; शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल

    नांदेड एलसीबी ने पिस्तूले व जिवंत काडतूसे पकडली; मध्यप्रदेशातील खंडवा येथील ‘छोटूसिंग’कडून नांदेडमध्ये पिस्तूल विक्री

    नांदेड एलसीबी ने पिस्तूले व जिवंत काडतूसे पकडली; मध्यप्रदेशातील खंडवा येथील ‘छोटूसिंग’कडून नांदेडमध्ये पिस्तूल विक्री

    ‘संविधान वाचवण्यासाठी भाजपला हद्दपार करा’ – सुरेश गायकवाड यांचे आवाहन

    ‘संविधान वाचवण्यासाठी भाजपला हद्दपार करा’ – सुरेश गायकवाड यांचे आवाहन

    भर पावसात हजारोंची उपस्थिती! महाविहार बावरीनगर येथे वर्षावास, धम्मदेशना

    भर पावसात हजारोंची उपस्थिती!  महाविहार बावरीनगर येथे वर्षावास, धम्मदेशना

    एसआयआरला मुदतवाढ; 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी व पडताळणी; पाहा संपूर्ण वेळापत्रक

    एसआयआरला मुदतवाढ; 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी व पडताळणी; पाहा संपूर्ण वेळापत्रक

    नांदेड पोलिसांची मोठी कारवाई: पंजाबमधील अंमली पदार्थ तस्करीतील फरार आरोपीला अटक

    नांदेड पोलिसांची मोठी कारवाई: पंजाबमधील अंमली पदार्थ तस्करीतील फरार आरोपीला अटक