शहराला आता पुन्हा दोन दिवसाआड पाणी पुरवठा

नांदेड शहराला आता दोन दिवस आड पाणी पुरवठा; महापालिकेत पाणी पुरवठा विभागाचा मनपा आयुक्तांनी घेतला आढावा

नांदेड –  शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही नांदेड महानगरपालिकेकडून नागरिकांना तीन ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता.  त्यामुळे वधरण उशाला आणि कोरड घशालाव अशी परिस्थिती झाली होती.  ऐन पावसाळ्यात नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता.  खरंतर दिवसाआड पाणी करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून नांदेडकर करीत आहेत.  परंतु कोट्यावधी रुपये खर्च करू नाही महापालिका प्रशासनाकडून नागरिकांची ही मागणी पूर्ण केली जात नाही.  पण उशिरा का होईना मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी आज पाणीपुरवठा विभागाची बैठक घेऊन यापूर्वीच घोषित केलेला दोन दिवसआड पाणीपुरवठा करण्याच्या सूचना पुन्हा एकदा दिल्या आहेत.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी पाणी पुरवठा विभागाची आज आढावा बैठक घेतली.  या बैठकीमध्ये शहरातील पाणी पुरवठा प्रथम प्राधाण्याने सुरळीत करण्याच्या सुचना त्यानी दिल्या आहेत.  काबरा नगर, डंकीन, सिडको व असदवन येथील जलशुध्दीकरण केंद्रावरुन होणाऱ्या पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानुसार सद्यस्थितीमध्ये झोन क्र.१ तरोडा-सांगवी, झोन क्र.४ वजिराबाद व झोन क्र.६ सिडको-हडको-कौठा या भागामध्ये दोन दिवस आड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तसेच झोन क्र.२ अशोक नगर, झोन क्र.३ शिवाजी नगर व झोन क्र.५ इतवारा-देगलुर नाका या भागातील जलकुंभावरुन तीन दिवस आड पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती यावेळी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली.

त्याअनुषंगाने डंकीन जलशुध्दीकरण केंद्र संपुर्ण क्षमतेने चालवुन इतर जलशुध्दीकरण केंद्रावरील ताण कमी करणे आवश्यक असुन त्याचप्रमाणे काबरा नगर जलशुध्दीकरण केंद्रावरील ताण कमी करण्यासाठी कोटीतीर्थ पंपगृह ते डंकीन जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत करण्यात येणारी ७५० मी.मी. व्यासाची ६.३ कि.मी. लांबीची मुख्य जलवाहीणीचे काम तातडीने पुर्ण करण्याचे निर्देश यावेळी आयुक्तांनी दिले आहेत. तसेच ज्या भागामध्ये तीन दिवस आड पाणी पुरवठा होत आहे त्या भागात आता दिनांक ०१.०९.२०२५ पासुन दोन दिवस आड पाणी पुरवठा करण्यासाठी आयुक्तांनी आदेशीत केले आहे.

तसेच सर्व जलशुध्दीकरण केंद्र व पंपगृह येथील विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळीत होत असतांना सुध्दा शहरास पाणी पुरवठा करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत असल्याचे यावेळी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आयुक्तांना सांगितले.

सदरील बैठकीस महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्यासह शहर अभियंता सुमंत पाटील, कार्यकारी अभियंता संघरत्न सोनसळे, उपअभियंता प्रकाश कांबळे, नरेंद्र सुजलेगांवकर, कनिष्ठ अभियंता सरपाते, जक्कीउल्ला खाँन, स्वामी, शेख जैनोद्दीन यांची उपस्थिती होती.

  • Avatar

    Ankush Sonsale

    Related Posts

    शेतीच्या वादातून 75 वर्षीय वृद्धेची गळा दाबून हत्या; आरोपी पुणे येथून गजाआड

    शेतीच्या वादातून 75 वर्षीय वृद्धेची गळा दाबून हत्या; आरोपी पुणे येथून गजाआड ​लोहा पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी;  गुन्हा दाखल होताच 3 दिवसांत आरोपीला अटक लोहा – ​तालुक्यातील ढगे पिंपळगाव येथे शेतीच्या…

    Continue reading
    आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या, यशोदाबाई बाबुराव निलंगेकर यांचे निधन

    आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या, यशोदाबाई बाबुराव निलंगेकर यांचे निधन नांदेड: आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते आणि भारिपचे प्रथम नगरसेवक कालवश बाबुरावजी निलंगेकर यांच्या पत्नी उपासिका यशोदाबाई निलंगेकर यांचे आज, दिनांक १२…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    शेतीच्या वादातून 75 वर्षीय वृद्धेची गळा दाबून हत्या; आरोपी पुणे येथून गजाआड

    शेतीच्या वादातून 75 वर्षीय वृद्धेची गळा दाबून हत्या; आरोपी पुणे येथून गजाआड

    आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या, यशोदाबाई बाबुराव निलंगेकर यांचे निधन

    आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या, यशोदाबाई बाबुराव निलंगेकर यांचे निधन

    लोहाच्या वडेपुरी शिवारात बिबट्याचा संचार; व्हिडीओ व्हायरल

    लोहाच्या वडेपुरी शिवारात बिबट्याचा संचार; व्हिडीओ व्हायरल

    नांदेड विभागाची ऐतिहासिक कामगिरी! एकाच दिवसात २ लाख ७६ हजार प्रवाशांची विक्रमी रेल्वे वाहतूक यशस्वीपणे हाताळली

    नांदेड विभागाची ऐतिहासिक कामगिरी! एकाच दिवसात २ लाख ७६ हजार प्रवाशांची विक्रमी रेल्वे वाहतूक यशस्वीपणे हाताळली

    शेतकऱ्यांच्या छाताडावर प्रशासनाचा ‘उत्सव’, खा. अशोक चव्हाणांचा मात्र वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

    शेतकऱ्यांच्या छाताडावर प्रशासनाचा ‘उत्सव’, खा. अशोक चव्हाणांचा मात्र वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

    उपमुख्यमंत्री अजित पवार नांदेडात दाखल; विमानतळावर जोरदार स्वागत

    उपमुख्यमंत्री अजित पवार नांदेडात दाखल; विमानतळावर जोरदार स्वागत