नांदेडमध्ये 7 ऑगस्ट रोजी विशेष सहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांसाठी शिबीर; DBT ची सुविधा उपलब्ध
नांदेड – तालुक्यातील विशेष सहाय्य योजनेच्या ज्या लाभार्थ्यांचे बँक खाते थेट लाभ हस्तांतरण (DBT) शी जोडलेले नाही, त्यांच्यासाठी गुरुवार, 7 ऑगस्ट 2025 रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे, निष्क्रिय झालेले आधार कार्ड पुन्हा सक्रिय करणे आणि मोबाईल नंबर लिंक करण्यासारखी कामे केली जातील.
या मोहिमेअंतर्गत, नांदेड शहर, नांदेड ग्रामीण, तरोडा बुद्रुक, नाळेश्वर आणि लिंबगाव मंडळातील लाभार्थ्यांसाठी तरोडा बुद्रुक येथील मंडळ अधिकारी कार्यालयात (शिवाजी हायस्कूलजवळ) शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे, वसरणी, वाजेगाव, तुप्पा आणि विष्णूपुरी या मंडळातील लाभार्थ्यांसाठी वसरणी येथील मंडळ अधिकारी कार्यालयात (डेअरी कॉर्नर) शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही ठिकाणी एकूण 146 लाभार्थ्यांची डीबीटी प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
या कामासाठी ब्रँच पोस्ट मास्तर, आधार किट संचालक आणि महसूल सेवक सहकार्य करणार आहेत. शिबिर सकाळी 10:00 वाजता सुरू होईल आणि कार्यालयीन वेळेपर्यंत सुरू राहील. ज्या लाभार्थ्यांची डीबीटी झालेली नाही, त्यांनी आधार कार्ड, पोस्ट खाते आणि अपंग असल्यास अपंगत्वाचे प्रमाणपत्र घेऊन शिबिराच्या ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार नांदेड यांनी केले आहे.






