आधार नोंदणी केंद्राच्या सेवा वेळेत व पारदर्शक द्या : जिल्हाधिकारी राहुल कर्डीले

आधार नोंदणी केंद्राच्या सेवा वेळेत व पारदर्शक द्या : जिल्हाधिकारी राहुल कर्डीले

· आधार केंद्र चालकांनी अतिरिक्त शुल्क आकारल्यास होणार कारवाई
· जिल्ह्यातील आधार केंद्र चालकांसाठी कार्यशाळा संपन्न

नांदेड – मागील काही दिवसांपासून नांदेड जिल्ह्यातील आधार केंद्रावर नागरिकांची खूप गर्दी दिसून येत आहे. यामुळे अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सध्या सर्व शासकीय योजनांच्या मुळाशी आधार असून ते अपडेट नसेल तर नागरिकांना योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे आधार केंद्र चालकांनी आधार नोंदणी व सुधारणा केंद्रांवर येणाऱ्या नागरिकांना वेळेत व पारदर्शक सेवा पुरवाव्यात. आधार केंद्र चालकांनी त्यांच्या कार्यप्रणालीत अधिक सुधारणा करून नागरिकांच्या सोयीसाठी जबाबदारीने काम करावे. नागरिकांकडून अतिरिक्त शुल्क आकारल्यास त्यांच्या विरुध्द कडक कारवाई केली जाईल, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे आज नांदेड जिल्ह्यातील सर्व आधार नोंदणी चालकांसाठी कार्यशाळा आयोजित केली होती, यावेळी ते बोलत होते. कार्यशाळेस निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर तसेच जिल्ह्यातील आधार केंद्र चालकांची उपस्थिती होती.

नागरिक अनेकदा आधार अपडेट अथवा नवीन नोंदणीसाठी आधार केंद्रात येतात, मात्र वेळेवर सेवा न मिळाल्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागतो. केंद्रावर उपस्थित कर्मचारी यांनी वेळेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने नागरिकांना सेवा द्यावी. तसेच याबाबत काही अडचणी किंवा शंका असतील तर त्या भारतीय विशिष्ट पहचान प्राधिकरणाचे सहायक प्रबंधक, यूआईडीएआई क्षेत्रीय कार्यालय मुंबईचे महेश शिंदे यांच्या मदतीने सोडवाव्यात. आधार नोंदणी करताना येणाऱ्या शंका व अडचणीचे निरसन करुन घ्यावे, असे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी स्पष्ट सांगितले.

तालुक्याच्या ठिकाणी जे आधार नोंदणी केंद्र आहेत तिथे संबंधित तहसिलदारांनी भेट देवून पाहणी करावी. ज्या आधार केंद्र चालकांची कामगिरी सुमार दर्जाची आहे त्यांनी त्यांच्या कामात सुधारणा करुन घ्यावी, असेही निर्देश जिल्हाधिकारी कर्डिले यांनी दिले. यावेळी मुंबई यूआईडीएआई क्षेत्रीय कार्यालयाचे महेश शिंदे यांनी आधार केंद्र चालकांना सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली. आधार केंद्र चालकांनी दैनंदिन कामकाज पार पाडताना येणाऱ्या शंका व अडचणी सोडविण्यासाठी प्रश्न विचारले त्यावर त्यांच्या अडचणी व शंकाचे निरसन केले. नवीन आधारकार्ड तयार करणे व सुधारणा करतांना महत्त्वपूर्ण असलेल्या अनेक बाबींची माहिती यावेळी दिली.

  • Avatar

    Ankush Sonsale

    Related Posts

    शेतीच्या वादातून 75 वर्षीय वृद्धेची गळा दाबून हत्या; आरोपी पुणे येथून गजाआड

    शेतीच्या वादातून 75 वर्षीय वृद्धेची गळा दाबून हत्या; आरोपी पुणे येथून गजाआड ​लोहा पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी;  गुन्हा दाखल होताच 3 दिवसांत आरोपीला अटक लोहा – ​तालुक्यातील ढगे पिंपळगाव येथे शेतीच्या…

    Continue reading
    आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या, यशोदाबाई बाबुराव निलंगेकर यांचे निधन

    आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या, यशोदाबाई बाबुराव निलंगेकर यांचे निधन नांदेड: आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते आणि भारिपचे प्रथम नगरसेवक कालवश बाबुरावजी निलंगेकर यांच्या पत्नी उपासिका यशोदाबाई निलंगेकर यांचे आज, दिनांक १२…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    शेतीच्या वादातून 75 वर्षीय वृद्धेची गळा दाबून हत्या; आरोपी पुणे येथून गजाआड

    शेतीच्या वादातून 75 वर्षीय वृद्धेची गळा दाबून हत्या; आरोपी पुणे येथून गजाआड

    आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या, यशोदाबाई बाबुराव निलंगेकर यांचे निधन

    आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या, यशोदाबाई बाबुराव निलंगेकर यांचे निधन

    लोहाच्या वडेपुरी शिवारात बिबट्याचा संचार; व्हिडीओ व्हायरल

    लोहाच्या वडेपुरी शिवारात बिबट्याचा संचार; व्हिडीओ व्हायरल

    नांदेड विभागाची ऐतिहासिक कामगिरी! एकाच दिवसात २ लाख ७६ हजार प्रवाशांची विक्रमी रेल्वे वाहतूक यशस्वीपणे हाताळली

    नांदेड विभागाची ऐतिहासिक कामगिरी! एकाच दिवसात २ लाख ७६ हजार प्रवाशांची विक्रमी रेल्वे वाहतूक यशस्वीपणे हाताळली

    शेतकऱ्यांच्या छाताडावर प्रशासनाचा ‘उत्सव’, खा. अशोक चव्हाणांचा मात्र वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

    शेतकऱ्यांच्या छाताडावर प्रशासनाचा ‘उत्सव’, खा. अशोक चव्हाणांचा मात्र वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

    उपमुख्यमंत्री अजित पवार नांदेडात दाखल; विमानतळावर जोरदार स्वागत

    उपमुख्यमंत्री अजित पवार नांदेडात दाखल; विमानतळावर जोरदार स्वागत