महावितरण अधिकाऱ्याकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला हरताळ; शहरातील बहुतांश DP उघड्याच; शिवनगरातही जीवघेणा खेळ

महावितरण अधिकाऱ्याकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला हरताळ; शहरातील बहुतांश DP उघड्याच; शिवनगरातही जीवघेणा खेळ

नांदेड -कोणत्याही वेळी वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने शहरातील विजेचे ग्राहक नागरिक पुरते वैतागले आहेत.  जवळपास महिन्याभरापासून महावितरण कंपनीचा हा खेळ रात्रंदिवस सुरू आहे .  काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती.  त्यात त्यांना चांगलेच खडसावले होते.  तरीही या अधिकाऱ्यांमध्ये काहीच फरक पडला नाही.  त्यातच गेल्या अनेक दिवसांपासून भर पडली आहे, ती म्हणजे, मुख्य रस्त्यावर गल्लीबोळात चौकात उभ्या असलेल्या उघड्या डीपींची. नांदेड शहरातील बहुतांश भागातील डीपी उघड्याच आहेत.  त्यामुळे नागरिकांच्या थेट जीवालाच धोका निर्माण झाला आहे.  शिवाय या डीपीमध्ये वारंवार बिघाड होत आहे.   महावितरणचे त्या त्या भागातील फ्युज कॉल सेंटरचे संपर्क मोबाईल एक तर बंद असतात किंवा हे कॉल कोणीही उचलत नाहीत.  अशावेळी नाईलाजाने अनेक नागरिक स्वतः फ्युज लावण्याचा प्रयत्न करतात.  सध्या अवकाळी पावसाचे थैमान सुरू आहे.  त्यामुळे हा धोका अधिकच गडद होत आहे.

शहरातील शिवनगर येथील DP नंबर 202 राशन दुकान जवळील मागील अनेक महिन्यापासून सतत ना दुरुस्त होत असून सतत लाईट जात असते कधी फ्यूज जातात तर कधी किटकॅट क्लिप तुटतात.रात्री अनेकवेळा परिसरातील नागरिकांना अंधारात रहावे लागते.विद्युत विभाग झोपा काढतो की काय असा सूर नागरिकांतून येत आहे.महावितरणचा कारभार सध्या राम भरोसे सुरू आहे.
फ्युजचे तार संपले,क्लिप नाहीत असे कारणे देत तात्पुरता जुगाडूपणा करून लाईनमेन निघून जातात.
अनेकवेळा उप अभियंता उमरीकर यांना तक्रार करून देखील सदर DP चे काम होत नाही.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी महावितरण विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांचे सोबत बैठक घेऊन सूचना दिल्या होत्या शहरातील सर्व रोहित्र दुरुस्त करून वीजपुरवठा सुरळीत ठेवा नागरिकांना नाहक त्रास होईल असे काम करू नका परंतु उमरीकर यांच्या सारख्या अधिकाऱ्याच्या हलगर्जी कामामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्या सारखे आहे.
नांदेड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये वीज पुरवठा सातत्याने खंडित होत आहे. विशेषतः संध्याकाळी व रात्रीच्या वेळेस वारंवार लाईट जाण्याचे प्रकार इतके वाढले आहेत की नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा थेट परिणाम होत आहे.
दरवेळी “वादळ”, “वारं”, “निसर्गामुळे खंडित पुरवठा” असे एकच कारण पुढे करून महावितरण जबाबदारी झटकत आहे, हे अत्यंत खेदजनक आहे. ही वारंवारता फक्त निसर्गामुळे नसून व्यवस्थापनातील दुर्लक्ष व तांत्रिक दुर्बलतेचा परिणाम आहे.
सदर परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर गंभीर परिणाम होत आहे. सध्या विध्यार्थी विविध परीक्षेची तयारी करत आहे, जी अत्यंत स्पर्धात्मक व महत्वाची परीक्षा असतात . मात्र, सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे अभ्यासासाठी लागणारा वेळ, एकाग्रता आणि मानसिक स्थैर्य यावर विपरीत परिणाम होत आहे. ऑनलाइन कोचिंग, चाचणी परीक्षा, डिजिटल स्टडी मटेरियल्स यासाठी अखंड वीज अत्यावश्यक आहे, आणि तीच मिळत नसल्याने अभ्यासाचा स्तर खालावत आहे.
याशिवाय सतत वीज खंडित झाल्यामुळे घरातील विद्युत उपकरणांनाही हानी होत आहे. वीज पुरवठा वारंवार कमी-जास्त होण्याने फ्रीज, संगणक, वाय-फाय राउटर यासारखी उपकरणे वारंवार बंद पडत आहेत.
प्रभाग क्र. 10 मधील वीज खंडिततेचा सखोल आढावा घेणे गरजेचे आहे,समस्येच्या मुळाशी जाऊन तात्काळ सुधारणा कराव्यात क्षमतेनुसार ट्रान्सफॉर्मर व डी.पी. बदलून वीज वितरण यंत्रणा मजबूत करावी. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होणारा परिणाम लक्षात घेऊन, वीज पुरवठा किमान परीक्षा कालावधीत तरी अखंड ठेवण्याची विशेष व्यवस्था करावी.अशी मागणी शिवनगर परिसरातील नागरिकांनी केली आहे.

  • Avatar

    Ankush Sonsale

    Related Posts

    शेतीच्या वादातून 75 वर्षीय वृद्धेची गळा दाबून हत्या; आरोपी पुणे येथून गजाआड

    शेतीच्या वादातून 75 वर्षीय वृद्धेची गळा दाबून हत्या; आरोपी पुणे येथून गजाआड ​लोहा पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी;  गुन्हा दाखल होताच 3 दिवसांत आरोपीला अटक लोहा – ​तालुक्यातील ढगे पिंपळगाव येथे शेतीच्या…

    Continue reading
    आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या, यशोदाबाई बाबुराव निलंगेकर यांचे निधन

    आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या, यशोदाबाई बाबुराव निलंगेकर यांचे निधन नांदेड: आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते आणि भारिपचे प्रथम नगरसेवक कालवश बाबुरावजी निलंगेकर यांच्या पत्नी उपासिका यशोदाबाई निलंगेकर यांचे आज, दिनांक १२…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    शेतीच्या वादातून 75 वर्षीय वृद्धेची गळा दाबून हत्या; आरोपी पुणे येथून गजाआड

    शेतीच्या वादातून 75 वर्षीय वृद्धेची गळा दाबून हत्या; आरोपी पुणे येथून गजाआड

    आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या, यशोदाबाई बाबुराव निलंगेकर यांचे निधन

    आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या, यशोदाबाई बाबुराव निलंगेकर यांचे निधन

    लोहाच्या वडेपुरी शिवारात बिबट्याचा संचार; व्हिडीओ व्हायरल

    लोहाच्या वडेपुरी शिवारात बिबट्याचा संचार; व्हिडीओ व्हायरल

    नांदेड विभागाची ऐतिहासिक कामगिरी! एकाच दिवसात २ लाख ७६ हजार प्रवाशांची विक्रमी रेल्वे वाहतूक यशस्वीपणे हाताळली

    नांदेड विभागाची ऐतिहासिक कामगिरी! एकाच दिवसात २ लाख ७६ हजार प्रवाशांची विक्रमी रेल्वे वाहतूक यशस्वीपणे हाताळली

    शेतकऱ्यांच्या छाताडावर प्रशासनाचा ‘उत्सव’, खा. अशोक चव्हाणांचा मात्र वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

    शेतकऱ्यांच्या छाताडावर प्रशासनाचा ‘उत्सव’, खा. अशोक चव्हाणांचा मात्र वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

    उपमुख्यमंत्री अजित पवार नांदेडात दाखल; विमानतळावर जोरदार स्वागत

    उपमुख्यमंत्री अजित पवार नांदेडात दाखल; विमानतळावर जोरदार स्वागत