संगीतमय ‘बुद्ध पहाट’ ने वातावरण धम्ममय; चेतनकुमार चोपडे यांच्या सुमधुर बुध्द भीम गीतांनी उपस्थिती मंत्रमुग्ध

संगीतमय ‘ बुद्ध पहाट ‘ ने वातावरण धम्ममय

चेतनकुमार चोपडे यांच्या सुमधुर बुध्द भीम गीतांनी उपस्थिती मंत्रमुग्ध

नांदेड – तथागत भगवान बुध्द यांच्या २५८८ व्या जयंतीचे औचित्य साधून  महाराष्ट्र बहुजन शिक्षक महासंघा च्यावतीने दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी कुसुम सभागृह येथे सोमवारी ( दि.१२)  पहाटे पाच वाजता आयोजित बुध्द पहाट या बहारदार कार्यक्रमाला नांदेडकर रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध गायक चेतनकुमार चोपडे प्रस्तुत् तुझ्या पाऊल खुणा भीमराया या बुध्द भिम गीत गायनाच्या सुमधुर संगीतमय सादरीकरणाने वातावरण धम्ममय झाले. नांदेडकरांच्या प्रचंड प्रतिसाद पार पडलेल्या बुद्ध पहाट कार्यक्रमांनी उपस्थित मंत्रमुग्ध झाले.

आज बुध्द पौर्णिमेच्या दिवशी भल्या पहाटे हजारो बौद्ध उपासक आणि उपासिका पांढरा शुभ्र पोशाख परिधान करून अतिशय श्रद्धायुक्त भावनेने या बुध्द पाहत या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या प्रसन्न आणि सांगीतिक कार्यक्रमाने कुसुम सभागृह अगदी भारावून गेले असल्याचे चित्र दिसून आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी तथागत गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यानंतर पुज्य भदंत पय्याबोधी थेरो आणि भिक्खु संघाच्यावतीने धम्मदेशना देण्यात आली.
सुप्रसिध्द गायक चेतनकुमार चोपडे आणि संच प्रस्तुत् ‘ तुझ्या पाऊल खुणा भीमराया ‘ या कार्यक्रमात त्यांनी साग्र संगीतासह सुमधुर आवाजात सादर केलेल्या एकापेक्षा एक सरस बुध्द भिम गीतांच्या उत्कृष्ट सादरीकरणाने याही वर्षी बुद्ध पहाट ऐतिहासिक ठरली. ‘ माझाच पूर्वजन्म मी पुन्हा पाहिला.. ‘, ‘ नात जुळू लागलं खालच्या वरच्या थरात..’,’ सोनियाची उगवली सकाळ..’, रमाईची पुण्याई मिळाली..’ आदीसह अनेक बहारदार भीम गीतांच्या उत्कृष्ट सादरीकरणाने या संगीतमय कार्यक्रमात चांगलीच रंगत भरली. हजारो बौद्ध अनुयायांमध्ये नवा जोश , नवी ऊर्जा निर्माण केली . या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक रोहिदास कांबळे आणि टी.पी.वाघमारे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्यगुच्छ देऊन स्वागत केले.
बुद्ध पहायच्या यशस्वीतेसाठी संयोजन समितीचे अध्यक्ष आर.बी.मादळे, उपाध्यक्ष सा.ना.भालेराव, मिलींद गायकवाड,बी.आर.धनजकर,
सचिव वसंत सोनकांबळे, यशवंत कांबळे,सहसचिव विद्याधर घायाळ, सल्लागार ऍड.अशोक देवकरे, इंजि.भरत कांनिदे, दिगांबर मोरे , बी.एम.मल्हारे, पुंडलिक कांबळे, गौतम कांबळे, एन.जी.कांबळे, जी.पी.मिसाळे, देविदास ढवळे, डॉ.हेमंत कार्ले, इंजि.वसंत वीर,इंजि.प्रतिक काळे ,वैजनाथ वानखेडे,प्रा.जे.टी.जाधव,आर.डी.सिंदगीकर,एम.जी.भालेराव,
नागोराव डोंगरे,अनंत शिकारेकर,अरूण केसराळीकर, साहेबराव हैबते,मारोतराव धुतुरे, प्रा. शुध्दोधन गायकवाड, नागोराव ढवळे, एल.जी.वाघमारे, संजय सोनकांबळे, बालाजी कांबळे , प्रसिध्दी प्रमुख राम तरटे, माधव गोधणे, नंदकुमार कांबळे, जयवर्धन भोसीकर, कुलदिप नंदुरकर,  संजय कदम आदींनी विशेष परिश्रम घेतले.सूत्रसंचालन कुलदीप नंदुरकर यांनी केले.

  • Avatar

    Ankush Sonsale

    Related Posts

    शेतीच्या वादातून 75 वर्षीय वृद्धेची गळा दाबून हत्या; आरोपी पुणे येथून गजाआड

    शेतीच्या वादातून 75 वर्षीय वृद्धेची गळा दाबून हत्या; आरोपी पुणे येथून गजाआड ​लोहा पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी;  गुन्हा दाखल होताच 3 दिवसांत आरोपीला अटक लोहा – ​तालुक्यातील ढगे पिंपळगाव येथे शेतीच्या…

    Continue reading
    आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या, यशोदाबाई बाबुराव निलंगेकर यांचे निधन

    आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या, यशोदाबाई बाबुराव निलंगेकर यांचे निधन नांदेड: आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते आणि भारिपचे प्रथम नगरसेवक कालवश बाबुरावजी निलंगेकर यांच्या पत्नी उपासिका यशोदाबाई निलंगेकर यांचे आज, दिनांक १२…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    शेतीच्या वादातून 75 वर्षीय वृद्धेची गळा दाबून हत्या; आरोपी पुणे येथून गजाआड

    शेतीच्या वादातून 75 वर्षीय वृद्धेची गळा दाबून हत्या; आरोपी पुणे येथून गजाआड

    आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या, यशोदाबाई बाबुराव निलंगेकर यांचे निधन

    आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या, यशोदाबाई बाबुराव निलंगेकर यांचे निधन

    लोहाच्या वडेपुरी शिवारात बिबट्याचा संचार; व्हिडीओ व्हायरल

    लोहाच्या वडेपुरी शिवारात बिबट्याचा संचार; व्हिडीओ व्हायरल

    नांदेड विभागाची ऐतिहासिक कामगिरी! एकाच दिवसात २ लाख ७६ हजार प्रवाशांची विक्रमी रेल्वे वाहतूक यशस्वीपणे हाताळली

    नांदेड विभागाची ऐतिहासिक कामगिरी! एकाच दिवसात २ लाख ७६ हजार प्रवाशांची विक्रमी रेल्वे वाहतूक यशस्वीपणे हाताळली

    शेतकऱ्यांच्या छाताडावर प्रशासनाचा ‘उत्सव’, खा. अशोक चव्हाणांचा मात्र वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

    शेतकऱ्यांच्या छाताडावर प्रशासनाचा ‘उत्सव’, खा. अशोक चव्हाणांचा मात्र वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

    उपमुख्यमंत्री अजित पवार नांदेडात दाखल; विमानतळावर जोरदार स्वागत

    उपमुख्यमंत्री अजित पवार नांदेडात दाखल; विमानतळावर जोरदार स्वागत