नांदेडात पहिल्यांदाच राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धांचे आयोजन; महसूलच्या अडीच हजार खेळाडूंचा सहभाग-जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेडला 21 ते 23 फेब्रुवारीला राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धा

राज्यातील अडीच हजार महसूल विभागातील खेळाडू, अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन

नांदेड – येथे पहिल्यांदाच राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.  दि. 21 ते 23 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर विभागाच्यावतीने राज्यस्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन श्री गुरु गोबिंदसिंघजी स्टेडियम येथे करण्यात आले आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेचे उदघाटन राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्य हस्ते होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज येथे दिली.
या स्पर्धा कार्यक्रमाचे अध्यक्ष नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे, प्रमुख अतिथी राज्यमंत्री योगेश कदम यांची उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमास स्थानिक खासदार व आमदार, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव, सर्व विभागीय आयुक्त, नोंदणी मुद्रांक महानिरीक्षक, जमाबंदी आयुक्त पुणे, सर्व अपर आायुक्त, सर्व जिल्हाधिकारी यांची उपस्थिती राहणार आहे.
या स्पर्धेमध्ये छत्रपती संभाजीनगर, कोकण, पुणे, नागपूर, अमरावती, नाशिक या महसूल विभागातील तसेच नोंदणी व मुद्रांक विभाग आणि जमाबंदी आयुक्त, पुणे अशा 7 विभागातील जवळपास दोन ते अडीच हजार पुरुष व महिला खेळाडू उपस्थित राहणार आहेत. यामध्ये संचलन, क्रिकेट, कबड्डी, व्हॉलीबाल, फुटबॉल, खो-खो, रिले, महिला थ्रो-बॉल आणि जलतरण या सांघिक खेळ प्रकाराचा समावेश आहे. तसेच बुद्धीबळ, कॅरम, टेबल टेनिस, बॅडमिंटन, लॉन टेनिस, 100,200,400 मीटर धावणे, लांब उडी, उंच उडी, गोळा, भाला, थाळी फेक, रिंग टेनिस आणि 45 वर्षावरील 3 कि.मी.चालणे इत्यादी वैयक्तिक 82 प्रकारच्या खेळातील मैदानी सामने श्री गुरुगोबिंदसिंघजी स्टेडीयम, इंदिरा गांधी मैदान, पिपल्स कॉलेज, सायन्स कॉलेज या मैदानावर तर जिल्हा क्रीडा संकुल आणि महानगरपालिकेच्या इनडोअर हॉल मध्ये इनडोअर प्रकारचे तसेच कै.शांताराम सगणे या जलतरणिकेमध्ये सर्व जलतरणाचे सामने होणार आहेत.

मैदानी खेळाव्यतिरिक्त सर्व 7 विभागाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन यशवंत कॉलेजच्या मैदानावर सायंकाळी 6 ते 10 वा.दरम्यान करण्यात आले आहे. उत्कृष्ट गायन, अभिनय, वैयक्तिक नृत्य, वेशभूषा, नक्कल, वादक, निर्मिती, दिग्दर्शक, कलाप्रकार, निवेदक, नाटीका इत्यादी कलाप्रकारचा समावेश आहे.

राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाच्या निमित्ताने जिल्हयात विविध राज्यस्तरीय व राष्ट्रीय खेळांचे स्पोर्टस हब तयार होण्यास चालना मिळणार आहे. त्याअनुषंगाने विविध खेळांच्या मैदानाचा विकास व इतर सोयीसुविधा उपलब्ध होतील. त्याचा ग्रामीण भागातील खेळाडूंना लाभ होईल. स्पर्धेच्या निमित्ताने राज्यभरातून अधिकारी व कर्मचारी खेळाडू जिल्हयात येणार आहेत. यामुळे जिल्हयात पर्यटन वाढीस संधी मिळेल.

या स्पर्धा तत्कालिन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या संकल्पनेतून, नूतन जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांच्या मार्गदशानाखाली, अपर जिल्हाधिकारी पी.एस.बोरगांवकर यांचे सनियंत्रणात आणि निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, सर्व संघटनांचे पदाधिकारी यांनी घेतलेल्या अहोरात्र परिश्रमामुळे पार पडत आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी माध्यम प्रतिनिधीशी साधला संवाद
जिल्ह्याच्या विकासावर भर देण्यासाठी सर्वाचे सहकार्य आवश्यक- जिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात सर्व माध्यमाच्या प्रतिनिधीशी संवाद साधला. माध्यम प्रतिनिधीशी संवाद साधताना त्यांनी नांदेड शहर व जिल्ह्यातील विविध विषयावरील समस्या व अडचणी जाणून घेतल्या. त्या समस्या सोडविण्यासाठी आपण प्राधान्याने प्रयत्न करु असे आश्वस्त केले. यात प्रामुख्याने नांदेड शहरातील रस्ते आणि धुळीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. नांदेड जिल्हा हा कृषी क्षेत्रात अग्रेसर असून इथे कृषी विषयक तसेच आरोग्य, शिक्षण, सिंचन या विषयावर प्राधान्याने काम करण्यात येईल असेही सांगितले. जिल्ह्यात कापूस, सोयाबिन उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच कंधार, लोहा, किनवट येथील प्रलंबित कामे पूर्ण करणे, नांदेड जिल्हा हरित करण्यासाठी वृक्ष लागवडीवर भर देण्यात येईल याबाबतही त्यांनी सांगितले.
नांदेड जिल्ह्याच्या विकासात सर्वाचा सहभाग आवश्यक असून यासाठी सर्वांचा पुढाकार आवश्यक असल्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

  • Avatar

    Ankush Sonsale

    Related Posts

    शेतीच्या वादातून 75 वर्षीय वृद्धेची गळा दाबून हत्या; आरोपी पुणे येथून गजाआड

    शेतीच्या वादातून 75 वर्षीय वृद्धेची गळा दाबून हत्या; आरोपी पुणे येथून गजाआड ​लोहा पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी;  गुन्हा दाखल होताच 3 दिवसांत आरोपीला अटक लोहा – ​तालुक्यातील ढगे पिंपळगाव येथे शेतीच्या…

    Continue reading
    आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या, यशोदाबाई बाबुराव निलंगेकर यांचे निधन

    आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या, यशोदाबाई बाबुराव निलंगेकर यांचे निधन नांदेड: आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते आणि भारिपचे प्रथम नगरसेवक कालवश बाबुरावजी निलंगेकर यांच्या पत्नी उपासिका यशोदाबाई निलंगेकर यांचे आज, दिनांक १२…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    शेतीच्या वादातून 75 वर्षीय वृद्धेची गळा दाबून हत्या; आरोपी पुणे येथून गजाआड

    शेतीच्या वादातून 75 वर्षीय वृद्धेची गळा दाबून हत्या; आरोपी पुणे येथून गजाआड

    आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या, यशोदाबाई बाबुराव निलंगेकर यांचे निधन

    आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या, यशोदाबाई बाबुराव निलंगेकर यांचे निधन

    लोहाच्या वडेपुरी शिवारात बिबट्याचा संचार; व्हिडीओ व्हायरल

    लोहाच्या वडेपुरी शिवारात बिबट्याचा संचार; व्हिडीओ व्हायरल

    नांदेड विभागाची ऐतिहासिक कामगिरी! एकाच दिवसात २ लाख ७६ हजार प्रवाशांची विक्रमी रेल्वे वाहतूक यशस्वीपणे हाताळली

    नांदेड विभागाची ऐतिहासिक कामगिरी! एकाच दिवसात २ लाख ७६ हजार प्रवाशांची विक्रमी रेल्वे वाहतूक यशस्वीपणे हाताळली

    शेतकऱ्यांच्या छाताडावर प्रशासनाचा ‘उत्सव’, खा. अशोक चव्हाणांचा मात्र वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

    शेतकऱ्यांच्या छाताडावर प्रशासनाचा ‘उत्सव’, खा. अशोक चव्हाणांचा मात्र वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

    उपमुख्यमंत्री अजित पवार नांदेडात दाखल; विमानतळावर जोरदार स्वागत

    उपमुख्यमंत्री अजित पवार नांदेडात दाखल; विमानतळावर जोरदार स्वागत