मुलाने स्वतःच्या घरातच 9 लाख 70 हजाराची चोरी करविली; अखेर पोलीसांनी बुरखा फाडला

Nanded Vruttavedh । नायगाव घरफोडीचा गुन्हा उघड Nanded Vruttavedh

नांदेड – येथील नायगाव पोलीस ठाणे हद्दीत झालेली मोठी घरफोडी स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या दोन दिवसांत उघडकीस आणली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, फिर्यादीच्या स्वतःच्या मुलानेच आपल्या मैत्रिणीच्या मदतीने हा घरफोडीचा कट रचल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे, अशी माहिती, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. या कारवाईत पोलिसांनी आरोपी मुलगा आणि त्याच्या विधिसंघर्षग्रस्त बालिकेला (मैत्रीण) ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 9 लाख 36 हजार 600 रुपये किमतीची रोख रक्कम जप्त केली आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी या गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी एका विशेष पथकाची नियुक्ती केली होती. पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे व त्यांच्या पथकाने गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास चक्रे फिरवली. संशयावरून फिर्यादीचा मुलगा शुभम कौठकर याच्याकडे पोलिसांनी सखोल चौकशी केली असता, त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

शुभमने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्याचे कुटुंब देवदर्शनासाठी बाहेर जाणार असल्याची पूर्वकल्पना त्याने आपल्या अल्पवयीन मैत्रिणीला दिली होती. इतकेच नव्हे तर घराच्या कुलूपाची अतिरिक्त चावी कुठे ठेवली आहे आणि घरात प्लॉट खरेदीसाठी मोठी रोकड ठेवली आहे, ही गुप्त माहितीही त्याने तिला पुरवली होती. दिनांक २६ जून रोजी कुटुंब घराबाहेर पडताच, पूर्वनियोजित कटानुसार त्या बालिकेने अतिरिक्त चावीचा वापर करून घरात प्रवेश केला आणि लोखंडी पेटीत ठेवलेले 9 लाख 70 हजार रुपये चोरून नेले.

गुन्ह्याचा उलगडा झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत चोरीला गेलेल्या रकमेपैकी 9 लाख 36 हजार 600 रुपयांची रोख रक्कम हस्तगत केली आहे. याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. ही उल्लेखनीय कामगिरी अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर), अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव (नांदेड) आणि पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनात पोउपनि नागनाथ तुकडे, दारासिंग राठोड, मोहन हाके, महेश बडगु, ब्रह्मानंद लामतुरे, शिलराज ढवळे, शितल सोळंके, लहू चाटे आणि आबाराव पिंगलवाड यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

Avatar

Ankush Sonsale

Related Posts

‘संविधान वाचवण्यासाठी भाजपला हद्दपार करा’ – सुरेश गायकवाड यांचे आवाहन

सुरेश गायकवाड यांचा ६९ वा वाढदिवस नांदेडमध्ये उत्साहात साजरा; ‘संविधान वाचवण्यासाठी भाजपला हद्दपार करा’ – गायकवाड यांचे आवाहन Nanded Vruttavedh । ​नांदेड – आंबेडकरवादी लोक मंचच्या वतीने काँग्रेसच्या अनुसूचित जाती…

Continue reading
भर पावसात हजारोंची उपस्थिती! महाविहार बावरीनगर येथे वर्षावास, धम्मदेशना

भर पावसात हजारोंच्या उपस्थितीत महाविहार बावरीनगर येथे वर्षावास प्रारंभ व धम्मदेशना कार्यक्रम उत्साहात संपन्न Nanded Vruttavedh दाभड (ता. अर्धापूर) – महाविहार बावरीनगर, दाभड येथे आषाढ पौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेला वर्षावास…

Continue reading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

‘संविधान वाचवण्यासाठी भाजपला हद्दपार करा’ – सुरेश गायकवाड यांचे आवाहन

‘संविधान वाचवण्यासाठी भाजपला हद्दपार करा’ – सुरेश गायकवाड यांचे आवाहन

भर पावसात हजारोंची उपस्थिती! महाविहार बावरीनगर येथे वर्षावास, धम्मदेशना

भर पावसात हजारोंची उपस्थिती!  महाविहार बावरीनगर येथे वर्षावास, धम्मदेशना

एसआयआरला मुदतवाढ; 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी व पडताळणी; पाहा संपूर्ण वेळापत्रक

एसआयआरला मुदतवाढ; 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी व पडताळणी; पाहा संपूर्ण वेळापत्रक

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई: पंजाबमधील अंमली पदार्थ तस्करीतील फरार आरोपीला अटक

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई: पंजाबमधील अंमली पदार्थ तस्करीतील फरार आरोपीला अटक

ठाकूरवाडी–मंकीहिल दरम्यान दरड कोसळली; पनवेल–नांदेड एक्सप्रेसच्या मार्गात आणि प्रस्थान स्थानकात बदल