शेतकऱ्यांच्या छाताडावर प्रशासनाचा ‘उत्सव’, खा. अशोक चव्हाणांचा मात्र वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

शेतकऱ्यांच्या छाताडावर प्रशासनाचा ‘उत्सव’, खा. अशोक चव्हाणांचा मात्र वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

नांदेड – जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या छाताडावर बसून नांदेड जिल्हा प्रशासनाने एकीकडे मोठ्या दिमाखात दिवाळी पहाट कार्यक्रम सलग पाच दिवस घेतला.  प्रशासनाला या शेतकऱ्यांची कीव आली नाही.  त्यांचे दुःख समजले नाही. मात्र राज्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या संकटकाळात त्यांची साथ सोडली नाही.  आर्थिक विवचनेत असलेल्या शेतकरी व त्यांच्या कुटुंबियांच्या परिस्थितीचे भान ठेवत यंदा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

यावर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे संपूर्ण मराठवाड्यावर मोठे नैसर्गिक संकट ओढवले आहे. विशेषतः नांदेड जिल्ह्यात मे महिन्यापासून दर महिन्याला कधी अतिवृष्टी आणि पूर, तर कधी वादळी वाऱ्यांमुळे शेतकऱ्यांचे व नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी यंदा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. 28 ऑक्टोबर रोजी चव्हाण यांचा वाढदिवस आहे.

याविषयी समाजमाध्यमातून माहिती देताना खा. चव्हाण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, “शेतकऱ्यांच्या संकटाच्या काळात वाढदिवस साजरा करणे उचित नसल्याने कोणीही केक, मिठाई, हार-तुरे किंवा पुष्पगुच्छ घेऊन येऊ नये, अशी माझी नम्र विनंती आहे.”

खा. चव्हाण यांनी पुढे सांगितले की, वाढदिवसाच्या दिवशी ते कुटुंबासह देवदर्शनाला जाणार आहेत. “सर्वांचा स्नेह, सदिच्छा आणि सहकार्य नेहमीच माझ्या पाठीशी राहिले आहे आणि भविष्यातही तसेच कायम राहील,” असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांप्रति सहानुभूती दर्शवत आणि त्यांची संवेदनशीलता जपत खा. अशोकराव चव्हाण यांनी हा निर्णय घेतला आहे.

  • Avatar

    Ankush Sonsale

    Related Posts

    राज्यातील २९ महानगरपालिका आणि नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; 15 जानेवारी रोजी मतदान, 16 जानेवारीला निकाल 

    राज्यातील २९ महानगरपालिका आणि नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर 15 जानेवारी रोजी मतदान, 16 जानेवारीला निकाल  नांदेड -महाराष्ट्र राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम आज राज्य निवडणूक आयोगाने घोषित…

    Continue reading
    मध्यमवर्गीयांचे वास्तव: तक्रार नव्हे, स्वनियोजनाची गरज!

    मध्यमवर्गीयांचे वास्तव: तक्रार नव्हे, स्वनियोजनाची गरज! आजच्या गतिमान अर्थव्यवस्थेत मध्यमवर्गीय कुटुंबावर वाढत्या महागाईसोबतच शिक्षण आणि आरोग्य या दोन क्षेत्रातील खर्चाचे मोठे ओझे आहे. उत्पन्न मर्यादित असताना, हे दोन्ही खर्च दिवसेंदिवस…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    राज्यातील २९ महानगरपालिका आणि नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; 15 जानेवारी रोजी मतदान, 16 जानेवारीला निकाल 

    राज्यातील २९ महानगरपालिका आणि नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर;  15 जानेवारी रोजी मतदान, 16 जानेवारीला निकाल 

    मध्यमवर्गीयांचे वास्तव: तक्रार नव्हे, स्वनियोजनाची गरज!

    मध्यमवर्गीयांचे वास्तव: तक्रार नव्हे, स्वनियोजनाची गरज!

    शेतीच्या वादातून 75 वर्षीय वृद्धेची गळा दाबून हत्या; आरोपी पुणे येथून गजाआड

    शेतीच्या वादातून 75 वर्षीय वृद्धेची गळा दाबून हत्या; आरोपी पुणे येथून गजाआड

    आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या, यशोदाबाई बाबुराव निलंगेकर यांचे निधन

    आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या, यशोदाबाई बाबुराव निलंगेकर यांचे निधन

    लोहाच्या वडेपुरी शिवारात बिबट्याचा संचार; व्हिडीओ व्हायरल

    लोहाच्या वडेपुरी शिवारात बिबट्याचा संचार; व्हिडीओ व्हायरल

    नांदेड विभागाची ऐतिहासिक कामगिरी! एकाच दिवसात २ लाख ७६ हजार प्रवाशांची विक्रमी रेल्वे वाहतूक यशस्वीपणे हाताळली

    नांदेड विभागाची ऐतिहासिक कामगिरी! एकाच दिवसात २ लाख ७६ हजार प्रवाशांची विक्रमी रेल्वे वाहतूक यशस्वीपणे हाताळली