नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व्यसनमुक्ती मार्गदर्शन केंद्राची स्थापना

नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व्यसनमुक्ती मार्गदर्शन केंद्राची स्थापना

नांदेड – केंद्र आणि राज्य शासनाच्या ‘ड्रग मुक्त मोहिम’ आणि ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या पुढाकाराने डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपूरी नांदेड येथे व्यसनमुक्ती मार्गदर्शन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. २८ जून रोजी अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन झाले.
नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने हे अभियान अधिक प्रभावीपणे राबवले जाणार आहे. नशाबंदीबाबत जनजागृती आणि प्रशिक्षणाचे आयोजन यात प्रामुख्याने केले जाईल. महाविद्यालयाच्या बाह्यरुग्ण विभागातील दंतशल्यचिकित्सा विभागामधील तंबाखू प्रतिबंध केंद्रामध्येच या व्यसनमुक्ती मार्गदर्शन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.
या उद्घाटन प्रसंगी उप अधिष्ठाता डॉ. वाय.एच. चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजयकुमार कापसे, दंत शल्य चिकित्सा शास्त्र विभाग प्रमुख डॉ. भावना भगत, तंबाखू प्रतिबंध केंद्र प्रमुख डॉ. सुशील येमले यांच्यासह निवासी डॉक्टर्स, परिचर्या संवर्गातील कर्मचारी, रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.
या केंद्राच्या स्थापनेमुळे व्यसनाधीन व्यक्तींना शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आधार मिळण्यास मदत होईल. या माध्यमातून त्यांना व्यसनातून बाहेर पडण्यासाठी समुपदेशन, योग्य उपचार आणि प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी व्यक्त केली. हे केंद्र समाजात व्यसनाबाबत जनजागृती करून व्यसनमुक्त आणि सक्षम समाज निर्माण करण्यास हातभार लावेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

  • Avatar

    Ankush Sonsale

    Related Posts

    क्रूरतेचा कळस! सरपंच व्हायचं होतं, पोटच्या ७ वर्षांच्या मुलीला कॅनॉलमध्ये फेकून मारलं; नराधम बापाला बेड्या

    क्रूरतेचा कळस! सरपंच व्हायचं होतं, पोटच्या ७ वर्षांच्या मुलीला कॅनॉलमध्ये फेकून मारलं; नराधम बापाला बेड्या ​ ​नांदेड/मुखेड: राजकारणाची आणि सत्तेची हाव माणसाला कोणत्या थराला नेऊ शकते, याचा एक अत्यंत विदारक…

    Continue reading
    विष्णुनगरमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे ३ गॅस सिलिंडरसह लाखोचा मुद्देमाल वाचवण्यात यश

    विष्णुनगरमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे ३ गॅस सिलिंडरसह लाखोचा मुद्देमाल वाचवण्यात यश ​नांदेड : विष्णुनगर भागात रविवारी पहाटे लागलेल्या आगीवर अग्निशमन दलाने वेळीच नियंत्रण मिळवल्याने मोठी जीवितहानी व वित्तहानी…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    क्रूरतेचा कळस! सरपंच व्हायचं होतं, पोटच्या ७ वर्षांच्या मुलीला कॅनॉलमध्ये फेकून मारलं; नराधम बापाला बेड्या

    क्रूरतेचा कळस! सरपंच व्हायचं होतं, पोटच्या ७ वर्षांच्या मुलीला कॅनॉलमध्ये फेकून मारलं; नराधम बापाला बेड्या

    विष्णुनगरमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे ३ गॅस सिलिंडरसह लाखोचा मुद्देमाल वाचवण्यात यश

    विष्णुनगरमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे ३ गॅस सिलिंडरसह लाखोचा मुद्देमाल वाचवण्यात यश

    अबब! ७५ लाखांचे साहित्य जिलेटीनने उडवले; मुदखेडमध्ये अवैध वाळू उपशावर मोठी कारवाई

    अबब! ७५ लाखांचे साहित्य जिलेटीनने उडवले; मुदखेडमध्ये अवैध वाळू उपशावर मोठी कारवाई

    लातूर आणि नांदेडमध्ये जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; पिस्तुलसह ८ लाख ६८ हजाराचा मुद्देमाल जप्त

    लातूर आणि नांदेडमध्ये जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; पिस्तुलसह ८ लाख ६८ हजाराचा मुद्देमाल जप्त

    नांदेडमध्ये ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ६ ट्रॅक्टरसह १७ लाखांचा मुद्देमाल जप्त

    नांदेडमध्ये ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ६ ट्रॅक्टरसह १७ लाखांचा मुद्देमाल जप्त

    विणकर कॉलनी ते लुंबिनीनगर रस्त्यावरील ड्रेनेजचे काम रखडले; शालेय विद्यार्थी आणि नागरिक मेटाकुटीला!

    विणकर कॉलनी ते लुंबिनीनगर रस्त्यावरील ड्रेनेजचे काम रखडले; शालेय विद्यार्थी आणि नागरिक मेटाकुटीला!