
पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली उद्या नांदेड जिल्हा नियोजन समितीची बैठक
नांदेड – जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली उद्या, शुक्रवार २० जून २०२५ रोजी नांदेड येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक सकाळी १०:३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे होणार आहे.
राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा, आणि दिव्यांग कल्याण मंत्री असलेले अतुल सावे, उद्या छत्रपती संभाजीनगर येथून सकाळी ५:३० वाजता वाहनाने नांदेडकडे प्रयाण करतील. सकाळी ९:३० वाजता त्यांचे नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात आगमन होईल. त्यानंतर सकाळी १०:३० वाजता ते जिल्हा नियोजन समितीच्या महत्त्वाच्या बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत जिल्ह्याच्या विविध विकासकामांचे नियोजन आणि आढावा घेतला जाईल.
बैठकीनंतर पालकमंत्री अतुल सावे सोयीनुसार नांदेड येथून छत्रपती संभाजीनगरकडे वाहनाने परत जातील.