नांदेड तहसीलचा मराठवाड्यात पहिला क्रमांक; मुख्यमंत्री 100 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा मोहिमेत लक्षणीय कामगिरी

नांदेड तहसीलचा मराठवाड्यात पहिला क्रमांक; मुख्यमंत्री 100 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा मोहिमेत लक्षणीय कामगिरी

नांदेड – मुख्यमंत्री 100 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा विशेष मोहिमेंतर्गत नांदेड तहसील कार्यालयाने सर्वांगीण उत्कृष्ठ कामगिरी करत मराठवाडा विभागात अव्वल स्थान मिळवले आहे. तहसीलदार संजय वारकड यांच्या नेतृत्वाखाली पारदर्शक, डिजिटल व नागरिकाभिमुख प्रशासनाचा आदर्श निर्माण करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, अप्पर जिल्हाधिकारी, पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी, महेश वडतकर, उपविभागीय अधिकारी, डॉ. सचिन खल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली संजय वारकड यांनी नेत्रदीपक कामगिरी बजावली आहे.

या मोहिमेंतर्गत नांदेड तहसीलने महत्त्वाच्या बाबींमध्ये प्रगती साधली आहे:

डिजिटल तहसील नांदेड अ‍ॅपच्या माध्यमातून 23 योजनांची माहिती व 20 प्रकारच्या प्रमाणपत्रांसाठी अर्जाची सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सेवांद्वारे आज पर्यंत अखेरपर्यंत 14,000 हून अधिक नागरिकांनी लाभ घेतला.

जलद प्रमाणपत्र वितरण सेवा सुरू करण्यात आली असून, 24 तासांत प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याची सुविधा गुगल फॉर्मद्वारे उपलब्ध झाली आहे. आतापर्यंत 217 नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे.

कार्यालयीन स्वच्छता, सुसज्ज प्रतीक्षागृह, RO फिल्टरड पाणी व्यवस्था, डिजिटल लायब्ररी व सायबर वॉल प्रकल्प राबवून कार्यालयात आधुनिकतेचा अवलंब करण्यात आला आहे.

ई-ऑफिस प्रणालीच्या 100% अंमलबजावणीमुळे कार्यक्षमतेत मोठी वाढ झाली असून जानेवारी ते एप्रिल दरम्यान 127 ई-फाईल्स आणि 544 ई-रजिस्टरचे कामकाज पार पाडले गेले.

तक्रार निवारणासाठी ‘लोकशाही दिन’, ‘आपले सरकार’ व ‘PG पोर्टल’ यांचा प्रभावी वापर करून सर्व तक्रारींवर वेळेत कार्यवाही करण्यात आली आहे.

AI आधारित तंत्रज्ञान जसे की ChatGPT व Grok चा वापर करून कामाच्या कार्यक्षमतेत नवचैतन्य निर्माण करण्यात आले आहे.

नांदेड तहसीलची ही प्रगती केवळ तालुक्यापुरती मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
या कामामध्ये नायब तहसीलदार स्वप्निल दिगलवार , काशिनाथ डांगे, नितेश कुमार बोलुलु, इंद्रजीत गरड, रवींद्र राठोड, सहाय्यक महसूल अधिकारी देविदास जाधव, कोटूरवार, सुचिता बोधगिरे, सुरेखा सुरुंगवाड, मंडळ अधिकारी शिवानंद स्वामी, लक्ष्मण नरमवार, व्‍यंकटी मुंडे, संतोष निलावार ,सचिन होंडाळकर, बालाजी नीलमवार सर्वच तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक कोतवाल यांनी परिश्रम घेतले.

  • Avatar

    Ankush Sonsale

    Related Posts

    क्रूरतेचा कळस! सरपंच व्हायचं होतं, पोटच्या ७ वर्षांच्या मुलीला कॅनॉलमध्ये फेकून मारलं; नराधम बापाला बेड्या

    क्रूरतेचा कळस! सरपंच व्हायचं होतं, पोटच्या ७ वर्षांच्या मुलीला कॅनॉलमध्ये फेकून मारलं; नराधम बापाला बेड्या ​ ​नांदेड/मुखेड: राजकारणाची आणि सत्तेची हाव माणसाला कोणत्या थराला नेऊ शकते, याचा एक अत्यंत विदारक…

    Continue reading
    विष्णुनगरमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे ३ गॅस सिलिंडरसह लाखोचा मुद्देमाल वाचवण्यात यश

    विष्णुनगरमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे ३ गॅस सिलिंडरसह लाखोचा मुद्देमाल वाचवण्यात यश ​नांदेड : विष्णुनगर भागात रविवारी पहाटे लागलेल्या आगीवर अग्निशमन दलाने वेळीच नियंत्रण मिळवल्याने मोठी जीवितहानी व वित्तहानी…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    क्रूरतेचा कळस! सरपंच व्हायचं होतं, पोटच्या ७ वर्षांच्या मुलीला कॅनॉलमध्ये फेकून मारलं; नराधम बापाला बेड्या

    क्रूरतेचा कळस! सरपंच व्हायचं होतं, पोटच्या ७ वर्षांच्या मुलीला कॅनॉलमध्ये फेकून मारलं; नराधम बापाला बेड्या

    विष्णुनगरमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे ३ गॅस सिलिंडरसह लाखोचा मुद्देमाल वाचवण्यात यश

    विष्णुनगरमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे ३ गॅस सिलिंडरसह लाखोचा मुद्देमाल वाचवण्यात यश

    अबब! ७५ लाखांचे साहित्य जिलेटीनने उडवले; मुदखेडमध्ये अवैध वाळू उपशावर मोठी कारवाई

    अबब! ७५ लाखांचे साहित्य जिलेटीनने उडवले; मुदखेडमध्ये अवैध वाळू उपशावर मोठी कारवाई

    लातूर आणि नांदेडमध्ये जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; पिस्तुलसह ८ लाख ६८ हजाराचा मुद्देमाल जप्त

    लातूर आणि नांदेडमध्ये जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; पिस्तुलसह ८ लाख ६८ हजाराचा मुद्देमाल जप्त

    नांदेडमध्ये ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ६ ट्रॅक्टरसह १७ लाखांचा मुद्देमाल जप्त

    नांदेडमध्ये ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ६ ट्रॅक्टरसह १७ लाखांचा मुद्देमाल जप्त

    विणकर कॉलनी ते लुंबिनीनगर रस्त्यावरील ड्रेनेजचे काम रखडले; शालेय विद्यार्थी आणि नागरिक मेटाकुटीला!

    विणकर कॉलनी ते लुंबिनीनगर रस्त्यावरील ड्रेनेजचे काम रखडले; शालेय विद्यार्थी आणि नागरिक मेटाकुटीला!