
शालांत प्रमाणपत्र परीक्षेत महात्मा फुले हायस्कूलचे उत्तुंग यश…
नांदेड – महाराष्ट्रातील नामांकित असणाऱ्या श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्या महात्मा फुले हायस्कूल बाबानगर, विजयनगर शाळेने शालांत प्रमाणपत्र परीक्षा 2025 मध्ये उत्तुंग यश प्राप्त केले आहे. शाळेचा निकाल 99.77% लागला असून 95 टक्क्याच्या वर 24.विद्यार्थी आहेत,तर 90 टक्क्याच्यावर 72 विद्यार्थ्यांनी गुण संपादित केले आहेत.
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, खा. अशोक चव्हाण, संस्थेच्या उपाध्यक्ष अमिताताई चव्हाण, सचिव, डी. पी. सावंत, सहसचिव डॉ. रावसाहेब शेंदारकर, खजिनदार एडवोकेट उदय निंबाळकर, कार्यकारणी सदस्या तथा भोकर विधानसभा मतदार संघाच्या आमदार अँड श्रीजयाताई चव्हाण, सुजयाताई चव्हाण, कार्यकारणी सदस्य सौ श्वेता पाटील, भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष नरेंद्र चव्हाण, पांडुरंग पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले शाळेने नेहमीच गुणात्मक आणि संख्यात्मक पातळीवर यशोशिखर गाठले आहे. दहावी परीक्षेत मिळालेल्या उत्तुंग यशाबद्दल प्रशालेच्या उपक्रमशील मुख्याध्यापिका सुरेखा कदम, उपमुख्याध्यापक अरुण कल्याणकर, पर्यवेक्षिका वैशाली देशमुख यांनी डी. पी.सावंत यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले.
याप्रसंगी सहसचिव डॉ रावसाहेब शेंदारकर, खजिनदार ॲड. उदय निंबाळकर, यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे, कार्यालयीन अधीक्षक किशोरसिंह ठाकुर, मराठीचे अध्यापक संतोष देवराये, इंग्रजीचे अध्यापक मनोज ताटे हे उपस्थित होते.
सचिव डी.पी. सावंत यांनी मुख्याध्यापक व सर्व शालेय प्रशासनाचे अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि त्यांना भविष्यातील त्यांच्या शैक्षणिक प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
मुख्याध्यापिका सुरेखा कदम यांनी या नेत्रदीपक यशाचे श्रेय शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना दिले आहे.