मेंदूचे विकार असणाऱ्या रुग्णांसाठी, आरोग्य शिबिराच्या नाव नोंदणीस प्रारंभ

मेंदूचे विकार असणाऱ्या रुग्णांसाठी, आरोग्य शिबिराच्या नाव नोंदणीस प्रारंभ
नांदेड – मेंदूचे विकार असणाऱ्या रुग्णांसाठी वरदान ठरत असलेल्या १८ वर्षाआतील मुला-मुलीकरीता येथील मगनपुरा भागातील आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात दि. २०ते २२ मार्च या कालावधीत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठीच्या नोंदणीस प्रारंभ झाला असून गरजूंनी त्वरित नोंदणी करावी असे आवाहन मुख्याध्यापक नितीन निर्मल यांनी केले आहे.
मुंबई येथील जय वकील फांउडेशन अँड रिसर्च सेंटर, बि.जे. वाडिया चिल्ड्रेन्स हॉस्पिटल व येथील राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात दरवर्षी दोन वेळा १८ वर्षाच्या आतील मेंदुचे विकार असणाऱ्या मुला-मुलींकरीता आरोग्य शिबीर आयोजित करण्यात येते.
आरोग्य शिबीरातील रूग्णांवर मुंबईच्या प्रसिध्द बाल मस्तिष्करोग तज्ञ डॉ. अनैता हेगडेसह तब्बल ३०-३५ डॉक्टरांची टीम आरोग्य शिबिरात रुग्णांची तपासणी व उपचार करणार आहेत. नेहमीप्रमाणे आवश्यकतेनुसार मोफत एमआरआय, सिटी स्कॅन, २-डी इको, ईईजी, ईसीजी, एक्सरे व पॅथॉलॉजीकल तपासण्या करण्यात येणार आहे.
आरोग्य शिबीराचे हे पंधरावे वर्ष असून आता पर्यंत झालेल्या एकोणतीस आरोग्य शिबीरात जवळपास ७ हजार रूग्णांना लाभ झाला आहे. आरोग्य शिबिरात तपासणी केलेल्या रुग्णांना आवश्यकते नुसार दररोज शाळेतील राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. एम. जी. बजाज रिहॅब्लीटेशन सेंटर येथे फिजीओ थेरपीची सोय निशुल्क उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आरोग्य शिबीर यशस्वी व्हावे यासाठी संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश गिल्डा, सचिव प्रकाश मालपाणी, उपाध्यक्ष कमल कोठारी, सहसचिव डॉ. लक्ष्मीकांत बजाज, कोषाध्यक्ष जयप्रकाश काबरा, बनारसीदास अग्रवाल, अंकित अग्रवाल आदींच्या मार्गदर्शनाखाली मूख्याध्यापक नितीन निर्मल तसेच आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालय व श्री रामप्रताप मालपाणी मूकबधिर विद्यालयाचे कर्मचारी परिश्रम घेत आहेत. आरोग्य शिबिरासाठी शाळेत प्रत्यक्ष उपस्थित राहून नोंदणी करावी तसेच आरोग्य शिबिरासाठी प्रत्यक्ष नोंदणी करणे अशक्य असलेल्यांनी डॉ. मनिषा तिवारी (८२०८११४८३२) व संजय रुमाले (९०६७३७७५२०) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

  • Avatar

    Ankush Sonsale

    Related Posts

    नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणूक: प्रभाग ६, ७ आणि ८ चा टपाली मतमोजणी तपशील जाहीर

    नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणूक: प्रभाग ६, ७ आणि ८ चा टपाली मतमोजणी तपशील जाहीर नांदेड: महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ ची टपाली मतपत्रिकांची मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली असून, प्रभाग क्र. ६,…

    Continue reading
    नांदेड महानगरपालिका निवडणूक २०२६: टपाली मतमोजणीचा सविस्तर तपशील जाहीर; प्रभाग १६, १७ आणि १८ मधील स्थिती स्पष्ट

    नांदेड महानगरपालिका निवडणूक २०२६: टपाली मतमोजणीचा सविस्तर तपशील जाहीर; प्रभाग १६, १७ आणि १८ मधील स्थिती स्पष्ट नांदेड: महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या मतमोजणी प्रक्रियेत टपाली मतपत्रिकांचा तपशील आता समोर…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणूक: प्रभाग ६, ७ आणि ८ चा टपाली मतमोजणी तपशील जाहीर

    नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणूक: प्रभाग ६, ७ आणि ८ चा टपाली मतमोजणी तपशील जाहीर

    नांदेड महानगरपालिका निवडणूक २०२६: टपाली मतमोजणीचा सविस्तर तपशील जाहीर; प्रभाग १६, १७ आणि १८ मधील स्थिती स्पष्ट

    नांदेड महानगरपालिका निवडणूक २०२६: टपाली मतमोजणीचा सविस्तर तपशील जाहीर; प्रभाग १६, १७ आणि १८ मधील स्थिती स्पष्ट

    नांदेड महानगरपालिका निवडणूक 2025: प्रभाग 10, 11 आणि 12 चा टपाली मतमोजणी तपशील जाहीर

    नांदेड महानगरपालिका निवडणूक 2025: प्रभाग 10, 11 आणि 12 चा टपाली मतमोजणी तपशील जाहीर

    नांदेड मनपा निवडणूक: प्रभाग १६ मध्ये टपाली मतदानाची मोजणी पूर्ण; चुरशीची लढत

    नांदेड मनपा निवडणूक: प्रभाग १६ मध्ये टपाली मतदानाची मोजणी पूर्ण; चुरशीची लढत

    बसस्थानकांवरील महिला चोरट्यांची टोळी जेरबंद; ५ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त

    बसस्थानकांवरील महिला चोरट्यांची टोळी जेरबंद; ५ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त

    नांदेड-गोवा विमानसेवेचा मार्ग मोकळा; ‘फ्लाय-91’ कडून दोन विमानांसाठी भाडेकरार पूर्ण

    नांदेड-गोवा विमानसेवेचा मार्ग मोकळा; ‘फ्लाय-91’ कडून दोन विमानांसाठी भाडेकरार पूर्ण