
नांदेड महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पाबाबत सूचना करण्याचे आयुक्तांचे नागरिकांना आवाहन
नांदेड – नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचा साल सन 2024 25 चा सुधारित अंदाज आणि सन 2025 26 26 मूळ अर्थसंकल्पीय तयार केला जाणार आहे. या अर्थसंकल्पात मनपाची उत्पन्न वाढ खर्च बचत सेवा सुविधांमध्ये सुधारणा तसेच शहरातील विकासात्मक दर्जामध्ये वाढ होण्याच्या दृष्टीने नागरिकांची मते जाणून घेतली जाणार आहेत. नागरिकांकडून आलेल्या योग्य सूचनांचा मूळ व सुधारित अंदाजपत्रकामध्ये समावेश केला जाणार आहे. त्यासाठी येत्या 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत शहरातील नागरिकांनी सूचना करण्याचे आवाहन महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे यांनी केले आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम ९५ ला अधिन राहुन नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे सन २०२४ २५ चे सुधारित अंदाज व सन २०२५-२६ चे मुळ अंदाजपत्रक तयार करणे प्रस्तावित आहे. सदर अंदाजपत्रकामध्ये नांदेड शहरातील नागरीकांना सहभाग घेण्याच्या दृष्टीने नांदेड शहरातील सर्व नागरीक, सामाजिक संघटना, जेष्ठ नागरीक, यांनी अंदाजपत्रकामध्ये मनपाच्या उत्पन्नात वाढ होणे, खर्चामध्ये बचत, सेवा सुविधामध्ये सुधारणा तसेच शहरातील विकासात्मक दर्जामध्ये वाढ या बाबत सूचना करण्याचे या द्वारे आवाहन करण्यात आले आहे.
यासाठी नागरीकांना आपल्या सूचना व अभिप्राय महानगरपालिकेच्या “cao@nwcmc.gov.in” या ई-मेल आयडीवर पाठवता येतील. तसेच मनपा क्षेत्रीय कार्यालय -१ तरोडा, २ अशोकनगर, ३ गणेशनगर, ४ वजिराबाद, ५ ईतवारा, ६ सिडको तसेच महानगरपालिका मुख्य कार्यालय लेखा विभाग, कक्ष क्रमांक ३०८ येथे उपलब्ध असलेल्या “अर्थसंकल्पीय सूचना पेटी”मध्ये दि. १० फेब्रुवारी २०२५ पुर्वी देण्यात याव्यात, जेणे करुन अंदाजपत्रक सर्व समावेशक व नागरीकाभिमुख होईल, असेही आयुक्तांनी कळविले आहे.