
नांदेड शहरात काँग्रेस पक्षांच्या स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात
गांधी पुतळ्याजवळील कार्यक्रमात शहरातील १ हजार नागरीकांचा उस्फुर्त प्रतिसाद
नांदेड – मतपत्रिकेवर मतदान घेण्यात यावे या मागणीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने ५ डिसेंबर रोजी नांदेड शहरात सह्यांची मोहिम सुरू केली असून कार्याध्यक्ष बालाजी चव्हाण यांच्या उपस्थितीत महात्मा गांधी पुतळ्याजवळ सुरवात केली आहे. काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी यावेळी मोठी गर्दी केली होती.
नांदेड शहरातील वजिराबाद भागातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ सकाळी ११ वाजता काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष बालाजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश सचिव डॉ श्रावण रॅपनवाड, सहसचिव श्याम दरक, सरचिटणीस केदार सोळंके, राजेश पावडे, प्रफुल्ल सावंत, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा डॉ रेखा चव्हाण, शहराध्यक्ष डॉ करुणा जमदाडे, माजी उपमहापौर अब्दुल गफार यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात झाली. महात्मा गांधी पुतळ्याजवळ सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत भव्य टेन्ट टाकून काँग्रेस पक्षाच्या वतीने हि मोहीम राबविण्यात आली. यावेळी नांदेड शहरातील असंख्य नागरीकांनी या मोहिमेस उत्सुर्त प्रतिसाद दिला. दिवसभरात जवळपास १ हजार महिला व पुरुषांनी स्वाक्षरी करुन आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यावेळी कार्याध्यक्ष महेश देशमुख, सतिश देशमुख, सत्यपाल सावंत, गगन यादव उपाध्यक्ष संजय वाघमारे, दिपकसिंघ हुजुरीया, तालुका अध्यक्ष निरंजन पावडे, अब्दुल मोहित, रिजवान कुरेशी, अजिज कुरेशी, माजी नगरसेवक शेर अली खान, अनिल ठाकुर, बापुराव पाटील, विठ्ठल पावडे, महेश शिंदे, सुलगेकर, बाबुराव सोंडारे, मुख्तार शेख, शकिल कुरैशी, युवक अध्यक्ष अतुल पेदेवाड, रावणगावकर, भिमा गायकवाड, पिंपळपले राजू, पप्पू शर्मा, उन्मेष ढवळे, गणेश पाटील, भारत खिल्लारे, कुमार कुर्तडीकर, गोविंद पाटील, धनंजय उमरीकर, सुनिल कांबळे, लांडगे हे उपस्थित होते.