
राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त महापालिकेतर्फे विशेष शिबीराचे आयोजन
नांदेड – महानगरपालिकेच्या वतीने राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त दिनांक ०४ डिसेंबर व १० डिसेंबर २०२४ रोजी महानगरपालिका कार्य क्षेत्रामध्ये वय वर्षे ०१ ते १९ वर्षे वयोगटातील बालकांना व किशोरवयीन मुला-मुलींना अल्बेडाझोल गोळी देण्यात येणार आहे. त्यामुळे बालकामध्ये होणारे कुपोषण थांबण्यास मदत होईल. सदर मोहिम अंगणवाडी, शाळा व महाविद्यालय व सर्व शासकिय रुग्णालयामध्ये मोफत अल्बेडाझोल गोळीची ०१ मात्रा देवून राबविण्यात येणार आहे.
त्याअनुषंगाने नांदेड शहरातील सर्व नागरिकांनी आपल्या वय वर्षे ०१ ते १९ वर्षे वयोगटातील बालकांना व किशोरवयीन मुला-मुलींना जंतनाशक गोळीची मात्रा देवून या मोहिमेचा लाभ घ्यावा. असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.