भोकरच्या उमेदवारांनो! निवडणूक खर्चाबाबत प्रशिक्षणाला तयार रहा

भोकर मतदारसंघात निवडणूक खर्चाबाबत
4 नोव्हेंबरला उमेदवारांचे प्रशिक्षण

नांदेड – 85-भोकर मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक लढविणाऱ्या, त्यांच्या खर्च प्रतिनिधींना उमेदवारांच्या निवडणूक खर्चाबाबतच्या भारत निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या तरतुदी अवगत करुन देण्यासाठी खर्च निरीक्षक यांच्या उपस्थित सोमवार 4 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 3.30 वा. निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय उपविभागीय अधिकारी कार्यालय सभागृह भोकर येथे उमेदवारांचे प्रशिक्षण आयोजित केले आहे. भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने हे प्रशिक्षण आयोजित केले आहे.

लोकप्रतिनिधीत्व अधिनियम , 1951 च्या कलम 77 नुसार निवडणुकीच्या वेळेस प्रत्येक उमेदवार एकतर तो स्वत: ,ती स्वत: किंवा त्याच्या , तीच्या निवडणूक प्रतिनिधीद्वारे त्याला, तीला नामनिर्देशित करण्यात आले आहे. त्या दिनांकापासून निवडणुकीच्या निकाल लागण्याच्या दिनांकापर्यत दोन्ही दिनांक धरुन, त्याने किंवा त्याच्या निवडणूक प्रतिनिधीने केलेला किंवा प्राधिकृत केलेल्या सर्व खर्चाचा स्वतंत्र व अचूक हिशेब ठेवणे आवश्यक आहे असे निवडणूक निर्णय अधिकारी 85 भोकर विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रविण मेगशेट्टी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

  • Avatar

    Ankush Sonsale

    Related Posts

    एकाही मताचा फरक नाही ; नांदेड लोकसभा,विधानसभेच्या ७५ केंद्रावर EVM व VVPAT पडताळणी

    EVM व VVPAT एकाही मताचा फरक नाही ; नांदेड लोकसभा,विधानसभेच्या ७५ केंद्रावर VVPAT पडताळणी आयोगाच्या सूचनेप्रमाणे नियमित प्रक्रिया पूर्ण नांदेड – मतमोजणी प्रक्रिये दरम्यान भारत निवडणूक आयोगाच्या सूचनाप्रमाणे प्रत्येक विधानसभा…

    Continue reading
    बॅलेट पेपरवर मतदान घ्या; नांदेड शहरात काँग्रेस पक्षांच्या स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात

    नांदेड शहरात काँग्रेस पक्षांच्या स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात गांधी पुतळ्याजवळील कार्यक्रमात शहरातील १ हजार नागरीकांचा उस्फुर्त प्रतिसाद नांदेड – मतपत्रिकेवर मतदान घेण्यात यावे या मागणीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने ५ डिसेंबर रोजी…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    क्रूरतेचा कळस! सरपंच व्हायचं होतं, पोटच्या ७ वर्षांच्या मुलीला कॅनॉलमध्ये फेकून मारलं; नराधम बापाला बेड्या

    क्रूरतेचा कळस! सरपंच व्हायचं होतं, पोटच्या ७ वर्षांच्या मुलीला कॅनॉलमध्ये फेकून मारलं; नराधम बापाला बेड्या

    विष्णुनगरमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे ३ गॅस सिलिंडरसह लाखोचा मुद्देमाल वाचवण्यात यश

    विष्णुनगरमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे ३ गॅस सिलिंडरसह लाखोचा मुद्देमाल वाचवण्यात यश

    अबब! ७५ लाखांचे साहित्य जिलेटीनने उडवले; मुदखेडमध्ये अवैध वाळू उपशावर मोठी कारवाई

    अबब! ७५ लाखांचे साहित्य जिलेटीनने उडवले; मुदखेडमध्ये अवैध वाळू उपशावर मोठी कारवाई

    लातूर आणि नांदेडमध्ये जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; पिस्तुलसह ८ लाख ६८ हजाराचा मुद्देमाल जप्त

    लातूर आणि नांदेडमध्ये जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; पिस्तुलसह ८ लाख ६८ हजाराचा मुद्देमाल जप्त

    नांदेडमध्ये ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ६ ट्रॅक्टरसह १७ लाखांचा मुद्देमाल जप्त

    नांदेडमध्ये ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ६ ट्रॅक्टरसह १७ लाखांचा मुद्देमाल जप्त

    विणकर कॉलनी ते लुंबिनीनगर रस्त्यावरील ड्रेनेजचे काम रखडले; शालेय विद्यार्थी आणि नागरिक मेटाकुटीला!

    विणकर कॉलनी ते लुंबिनीनगर रस्त्यावरील ड्रेनेजचे काम रखडले; शालेय विद्यार्थी आणि नागरिक मेटाकुटीला!